आराध्या आई सारखी जास्त दिसते की वडिलांसारखी? या प्रश्नाचे उत्तर देताना जया बच्चन आपल्या सुने बद्दल काय म्हणाल्या हे ऐकून विश्वास बसणार नाही. ऐकून

आपल्या भारतातील सर्वांत प्रसिद्ध अशा बच्चन कुटुंबाची लेक म्हणजे आराध्या बच्चन! त्यामुळेच तर ती कायम मीडिया आणि बातम्यांच्या लाइमलाइट मध्ये असते. १६ नोव्हेंबर २०११ मध्ये आराध्याचा जन्म मुंबईत झाला. तर आता २०२२ मध्ये ती १० वर्षांची झाली आहे. आपला दहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी यावेळी ती आपले मम्मी- पप्पा अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यासोबत खास मालदीवला गेली होती.

आराध्या ही संपूर्ण बच्चन कुटुंबाची लाडकी मुलगी आहे. कोणत्याही आजी आजोबांसाठी आपले नातवंड म्हणजे दुधावरच्या सायी सारखे असतात. तसंच आपल्या आजी-आजोबांची देखील ती खूपच जास्त लाडाची आहे. जया बच्चन म्हणजेच तिची आजी यांचा तर तिच्यावर अगदी खूप जीव आहे. जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, यावेळी कौन बनेगा करोङपती सीझन १३ मध्ये अमिताभ बच्चन होस्ट म्हणून दिसले होते. त्यादरम्यान ते आपली नात आराध्या विषयीच्या खूप साऱ्या गोष्टी शेयर करताना दिसत होते.

यावेळी अमिताभजी म्हणत होते की, ”
आराध्या ची आजी तिची खूप काळजी करते. जेव्हा पासून तिचा जन्म झाला आहे, तेव्हापासून ते आजपर्यंत सर्वच लोक ऐश्वर्या सोबत आराध्या ची तुलना करत आहेत. प्रत्येकाला आराध्या मध्ये ज्युनियर ऐश्वर्या दिसावी, असे वाटते.”

आराध्या मोठी झाल्यावर आपली आई ऐश्वर्या सारखी सुंदर दिसेल की नाही, यावर जया बच्चन यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे सर्वांसमोर मांडले,

त्या म्हणाल्या की,”आराध्या अजून खूप लहान आहे. ती खूपच निरागस आणि गोड आहे. पण काही लोक आतापासूनच तिच्यामध्ये तिच्या आईवडिलांचे गुण पाहायला टपले आहेत. जास्तीत जास्त तर त्यांना आराध्या मध्ये ऐश्वर्या चे सौंदर्य दिसावे, असेच वाटते. आराध्या ची उंची जास्त आहे. त्यामुळे तिच्यामध्ये तिच्या आई व वङिल या दोघांचेही लुक दिसतात.”

हे सर्व म्हणणे मांडत असताना जया बच्चन ह्या आपली सून ऐश्वर्या हिच्या देखील सौंदर्याची स्तुती न विसरता मनसोक्त करत होत्या….त्या म्हणाल्या की, “माझी सून ऐश्वर्या जितकी सुंदर आहे, तितकीच ती संस्कारी आणि एक जबाबदार आई सुद्धा आहे. आपल्या मुलीचे सर्व काम अगदी ती स्वतःच करते. आराध्या च्या बाबतीत तिला कुणाचाही हस्तक्षेप अजिबात मंजूर होत नाही. त्यामुळे आराध्या खूप नशीबवान आहे की तिला मिस वर्ल्ड ऐश्वर्या ‘आई’ म्हणून लाभली!”

आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप