खुपच सुंदर दिसते CID फेम ‘दयाची बायको’ फोटो पाहून म्हणाल, Made For Each Other!

१९९८ पासून २०१८ पर्यंत अशी जवळपास २० वर्षं दणक्यात चालू असलेला कार्यक्रम म्हणजे ‘सीआयडी’ (CID). छोट्या पडद्यावरील हा कार्यक्रम अगदी आबालवृद्धांनी पाहिला आहे आणि त्याला मनापासून हृदयात स्थान ही दिले आहे. भारतीय इतिहासातील सर्वांत जास्त काळ सुरू असलेला कार्यक्रम म्हणून ‘सीआयडी’ मालिकेने हा मान मिळवला आहे. या दरम्यान या कार्यक्रमाचे एकूण १५४७ भाग प्रदर्शित झाले आहेत. सर्व टीमने यात दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकलेली. परंतु यातील सगळ्यांत जास्त लक्षात राहिलेली पात्रे म्हणजे एसीपी प्रद्युम्न, सिनियर इन्स्पेक्टर अभिजीत आणि सिनियर इन्स्पेक्टर दया.!

यातील धिप्पाड शरीरयष्टी कमावलेला सिनियर इन्स्पेक्टर दया आपल्या ताकदीसाठी खूपच प्रसिद्ध झाला होता. तसेच त्याचा “जब दया का हाथ पडता है, तो मूंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है” हा डायलॉगही खूप लोकप्रिय झाला होता. एसीपी प्रद्युम्न त्याला म्हणायचे, की “दया, दरवाजा तोड दो.” दोघांचा ही हा डायलॉग अजूनही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dayanand Shetty (@dayanandshetty_official)

हा संवाद इतका लोकप्रिय आहे, की ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटातही अजय देवगण दयाला हाच संवाद म्हणतो. ‘सीआयडी’ मध्ये ज्याला बघून गुंडांची घाबरगुंडी उडायची, अशा दयाचे पात्र साकारले होते अभिनेता दयानंद शेट्टी यांनी. दयानंदने दिलजले (१९९६), जॉनी गद्दार (२००६), रनवे (२००९) आणि सिंघम रिटर्न्स (२०१४) या सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

दयानंदचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी कर्नाटकात झाला. तो आधी एक खेळाडू होता. गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात त्याने अनेक बक्षिसे जिंकली आहेत. पायाच्या दुखापतीमुळे त्याची खेळातील कारकीर्द संपुष्टात आली. मात्र त्यानंतर लगेचच त्याची अभिनयातील कारकीर्द सुरू झाली. त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम करत नाटकांसाठी पुरस्कार देखील मिळवले आहेत. ‘सीआयडी’ साठी त्याने ऑडिशन दिली आणि त्याचे सिलेक्शन झाल्यानंतर जे घडले, त्याने भारतीय मनोरंजन सृष्टीत नवीन इतिहासच घडवला.

दयानंदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. त्याच्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश शेट्टी असून आईचे नाव उमा शेट्टी आहे. त्याला नैना आणि संध्या नावाच्या दोन बहिणी देखील आहेत. दयानंदच्या पत्नीचे नाव स्मिता शेट्टी असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. या दोघांना एक मुलगी असून त्यांनी आपल्या मुलीला प्रसार माध्यमांपासून लांबच ठेवले आहे. काय मग प्रेक्षका हो, कशी वाटली तुम्हाला आपल्या लाडक्या दयाची ही माहिती? वाचून चकित झाला असाल ना? तुमच्या आवडत्या कलाकारांची अशीच नाविन्यपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आमचे लेख शेवटपर्यंत जरूर वाचत चला. तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करून आम्हाला अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका.!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप