चेतेश्वर पुजारासाठी लॉर्ड्सच्या मैदानात बॅट ने घातला धमाकूळ , भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण..!

अनुभवी भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा कौंटी चॅम्पियनशिप च्या या मोसमात वेगळ्या पातळी वर फलंदाजी करत आहे कारण त्याने या हंगामात पाचवे शतक दुहेरी शतकात रूपांतरित केले आहे आणि त्याच्या फॉर्म तसाच सुरूच ठेवला आहे. पुजाराने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड वर मिडलसेक्स विरुद्ध ४०३ चेंडूत २३१ धावा केल्या आहेत आणि तो बाद झाल्या नंतर, आयकॉनिक स्टेडियम मध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भारतीय खेळाडू बद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.

पुजाराने त्याचे द्विशतक पूर्ण केल्या नंतर हे दृश्य बनले होते, बाल्कनीतील त्याच्या सहकारी खेळाडूंनी उभे राहून त्याच्या साठी टाळ्या वाजवल्या आणि नंतर टीम मुर्ताघचा चेंडू मारल्या नंतर संपूर्ण स्टेडियम उभे राहिले आणि पुजाराने खेळलेल्या या शानदार खेळीचे कौतुक केले होते.

दुसरीकडे लॉर्ड्स कॉरिडॉर वर पुजारा चे स्वागत कॅमेऱ्यात दिसले नाही, परंतु लॉर्ड्स ने त्यांच्या इंस्टाग्राम वरील एका छायाचित्रा द्वारे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या मध्ये त्यांनी पोस्टसह कॅप्शन मध्ये लिहिले की, चेतेश्वर पुजाराने लॉर्ड्स वर २३१ धावांची आठवणीत ठेवण्या सारखी खेळी खेळली आहे.

इतकेच नाही तर भारताचा माजी फिरकी पटू आणि पुजाराचा सहकारी हरभजन सिंग ने या पोस्ट वर छान खेळलास पुजारा अशी कमेंट देखील केली आहे. बुधवारी मिडल सेक्स विरुद्ध च्या कौंटी क्रिकेट सामन्यात चेतेश्वर पुजारा ने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावून आपली बाजू मजबूत स्थितीत आणली आहे.

त्याने सकाळी ११५ धावांनी सुरुवात केली होती आणि त्याने आपल्या डावात ४०३ चेंडूत २३१ धावा केल्या ज्यात त्याने २१ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश केला होता. या मोसमातील हे त्याचे तिसरे द्विशतक आहे. या डावात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये त्याने १८००० धावाही पूर्ण केल्या आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप