भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वोत्त्तम कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या कारकिर्दीत भारताने अनेक विजय मिळवले. धोनीचे कोट्यवधी फॅन फोल्लोविंग आहे. या फॅन्स साठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. एमएस धोनी बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनी चित्रपटात कॅमिओ रोल करू शकतो. आणि महेंद्रसिंग धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टारला फोन करून चित्रपट करण्यास सांगितले आहे. यानंतर क्रीडा जगता आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना मोठी बातमी मिळाली आहे.
एमएस धोनी चित्रपट निर्माता बनणार आहे. तो दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार थलपथी विजयसोबत चित्रपट करणार आहे.बॉलिवूडमधली एमएस धोनीची ही सर्वोत्तम एंट्री असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या चित्रपटात एमएस धोनीही कॅमिओ करू शकतो, अशी अपेक्षा आहे. एमएस धोनीने काही काळापूर्वी त्याचे प्रोडक्शन हाऊस लॉन्च केले होते. नुकतीच त्याअंतर्गत एक ऍनिमेशन मालिकाही बनवण्यात आली. याआधी, एमएस धोनीच्या जीवनावरील ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट देखील एमएस धोनीचा जवळचा मित्र आणि व्यावसायिक भागीदार अरुण पांडे यांनी तयार केला होता.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात एमएस धोनीची भूमिका साकारली होती. यासोबत कियारा अडवाणी आणि दिशा पटानी यांनीही या चित्रपटातून डेब्यू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीने स्वतः विजयला फोन करून त्याच्या चित्रपटात काम करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे थलपथी विजयने धोनीची ही ऑफर स्वीकारली आहे.
आयपीएल २०२२ च्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब झाली आहे. चेन्नईच्या संघाला सुरुवातीच्या १३ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले, त्यामुळे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. एमएस धोनीने आयपीएल २०२२ च्या मोसमापूर्वी कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले.
धोनीबद्दल बोलाचे झाले तर धोनीने १९९९-२००० मध्ये बिहार रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आणि सलग तीन वर्षे बिहार संघाकडून खेळला. तिथे त्याने चांगली कामगिरी केली, आणि रणजी ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावले आणि २००३ मध्ये झारखंडमध्ये तो चांगला खेळला. तिथून त्याने भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकाश पोदार यांनी धोनीची खेळी पाहून भारतीय क्रिकेट संघाला पत्र लिहिले. तेव्हा पासून धोनीची कारकीर्द सुरू झाली.