मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की धोनी केवळ त्याच्या काळातीलच नव्हे तर आजच्या काळातील सुद्धा सर्वात यशस्वी लोकप्रिय खेळाडू आहे. आणि त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. धोनीने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र धोनी अजूनही सतत आयपीएल लीग खेळताना दिसत आहे.
पण, असे होऊ शकते की आयपीएल २०२२ हा सीझन धोनीचा आयपीएलचा शेवटचा सीझन असेल. धोनीची लोकप्रियता किती आहे हे सर्वांना माहीतच आहे,आणि धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने ४ वेळा आयपीएल चे विजेतेपदही जिंकले आहे. पण अलीकडेच एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आयपीएल टीम CSK आणि धोनीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
खरंतर , मीडियामध्ये एक बातमी खूप वेगाने समोर आली आहे, की धोनी गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखण्याशी झुंज देत आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी त्याला ४ ते ५ आठवडे विश्रांती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि आता असे मानले जात आहे की IPL CSK संघाचा कर्णधार धोनी आयपीएल २०२२ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.
आणि दुसरीकडे, धोनीच्या अनुपस्थितीत CSK संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारतीय संघातील धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे जाऊ शकतेअसेही बोलले जात आहे. सध्या ही चिंतेची बाब आहे की जर धोनी ४ ते ५ आठवडे विश्रांती घेऊ शकत नसेल तर त्याला किमान २ आठवडे तरी विश्रांती घ्यावी लागेल.
असेही बोलले जात आहे की धोनीचे हे आयपीएल शेवटचे असू शकते, त्यानंतर तो आयपीएलपासून दूर देखील राहू शकतो. धोनी जर सामन्यातून बाहेर पडला तर CSK नवीन कर्णधाराच्या शोधात असेल आणि हा शोध जडेजासोबत संपुष्टात येऊ शकतो. धोनीच्या पाठदुखीचा त्रास खूप दिवसांपासून आहे, पण असे असूनही त्याने आपला खेळ कायम ठेवला आहे. आणि ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही अनेकवेळा धोनी पाठदुखीमुळे आयपीएलच्या काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
मात्र त्यादरम्यान धोनीऐवजी सीएसकेची कमान सुरेश रैनाच्या हाती देण्यात आली होती. पण सगळ्यांनाच माहिती आहे की, यावेळी रैनाचा संघात समावेश नसल्यामुळे यावेळी कर्णधारपदाची जबाबदारी जडेजाच्या खांद्यावर जाणार आहे. पण सध्या धोनीच्या चाहत्यांना आशा आहे की लवकरात लवकर धोनी पूर्वीसारखा चपळ होईल. आणि मॅचमध्ये खेळताना दिसला.