इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पूर्णपणे ढासळलेला दिसत आहे.५ वेळाआयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला शनिवारी आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले असून, या मोसमातील मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे.शनिवारी मुंबई इंडियन्सला आरसीबीशी सामना करावा लागला. जिथे मुंबईवर आरसीबीचे पारडे जड होते. येथे मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ गडी राखून पराभव करत सलग चौथ्या पराभवाची पूर्तता केली.
मुंबई इंडियन्सला या मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत, जे आतापर्यंत झाले नाही.या सामन्यात मुंबई पलटणच्या संघाकडून अनेक चुका झाल्या त्यामुळेमुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. चला तर मग जाणून घेऊ अशी 3 कारणे ज्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.
१)मुंबई इंडियन्सची मधली फळी ढासळली: या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावली आणि नंतर फलंदाजीला उतरला. मुंबई इंडियन्सचे सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात केली.दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जोडल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. या शानदार सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणे सहज शक्य होते. मात्र मुंबईने ५० धावांत पहिली विकेट गमावताच ही स्थिती पाहता ६२ धावांत ५अशी अवस्था झाली. मधली फळी खराब झाली. आणि संघाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
२)जसप्रीत बुमराहसोबत एकही विकेट घेणारा गोलंदाज नाही: मुंबई इंडियन्सचा सलग ४ सामन्यांमध्ये हा चौथा पराभव झाला. या सामन्यातही मुंबई इंडियन्सची एक कहाणी चालू राहिली, ती म्हणजे त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एक साईड ने उत्तम गोलंदाजी करत असताना दुसऱ्या टोकाकडून कोणीही त्याला साथ देताना दिसत नाही.मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत बुमराह हा एकमेव विकेट घेणारा गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहशिवाय कोणताही विकेट घेणारा गोलंदाज दिसत नाही. याच कारणामुळे जसप्रीत बुमराहचा वापर करणे कर्णधारालाही कठीण जात आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवात बुमराहला कोणत्याही गोलंदाजाची साथ न मिळणे हे सर्वात मोठे कारण ठरत आहे.
३)मुंबईला दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची कमतरता भासत आहे: यावेळी मुंबई इंडियन्सची एक कमतरता प्रत्येक सामन्यात स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे फिरकी गोलंदाजी. फिरकी गोलंदाजीतील एकमेव व्यावसायिक फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विनच्या रूपाने मुंबई इंडियन्स सातत्याने दाखवत आहे. मुरुगन अश्विन आपले काम चोख बजावत आहे पण त्याला आणखी एका फिरकी जोडीदाराची उणीव भासत आहे.