मराठमोळा प्रवीण तांबे वयाच्या ४१ वर्षी IPL मध्ये धमाका करणारा, सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर झाला Release !! राहुल द्रविडही झळकणार सिनेइंडस्ट्री मध्ये

मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीवर आधारित असलेला ‘कौन प्रवीण तांबे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचे दिगग्ज प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे.

मेरी कॉम असेल, एम. एस धोनी किंवा सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या बायोपिक नंतर आता आणखी एका खेळाडूच्या संपूर्ण आयुष्यावर आणि त्यांच्या क्रिकेटप्रति असलेल्या प्रेमावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपला मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीवर आधारित ‘कौन प्रवीण तांबे’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रीझर लाँच करण्यात आला असून विशेष म्हणजे या सिनेमा मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन केले आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच करण्यात आला आहे.‌ प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात त्याची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला असून, त्याला चाहत्यांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे.

आपल्या अतिशय दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर क्रिकेटमध्ये यश मिळवणाऱ्या तांबेच्या आयुष्यावरील या चित्रपटात त्याची संपूर्ण आयुष्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.‌ केवळ क्रिकेट आणि क्रिकेट याच गोष्टीसाठी जगणाऱ्या प्रवीणच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचे दिगग्ज प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये द्रविड स्पष्ट दिसून येतात. तर, या भूमिकेसाठी श्रेयस तळपदे याचेदेखील विशेष कौतुक केले जात आहे. जयप्रद देसाई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या १ एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिजनी हॉटस्टारवर या वर प्रदर्शित होईल.

या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे या अभिनेत्याने चित्रपटाच्या एकंदर अनुभवाबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. प्रवीण तांबे यांची भूमिका साकारणे हे माझे अहोभाग्य आहे. “‘इक्बाल’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी पडद्यावर प्रवीणची मुख्य भूमिका साकारताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अशी भूमिका आणि कथेची संधी प्रत्येकाला एकदाच मिळते. चित्रीकरणाचा प्रत्येक मिनिट मला खूप आवडला. अशी भावना श्रेयसने यावेळी व्यक्त केली.

प्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएल मध्ये पदार्पण केलं होत. राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांकडून तो सामने खेळला आहे. त्याने मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पणही केलं होतं. तसं पाहायला गेलो तर खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात प्रवीण तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.ही विशेष आश्चर्यकारक बाब म्हणायला हवी!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप