पाकिस्तानातील नावाजलेले पेशावर शहर सध्या बॉम्बस्फोटाच्या मोठ्या धक्क्याने हादरले आहे. पेशावरमधील जामा मशीदीमध्ये बॉंबस्फोट घडवून आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. सारे मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना गर्दीला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला आहे. या दुर्देवी बॉम्बस्फोटामध्ये ५६ जणांचा दुर्दैवी मृ’त्यू झाला आहे तर ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ पेशावरमधील लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पेशावरमधील एका मोठ्या मशिदीत हा झाल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत किमान ५६ लोक मृ;’त्यूमुखी पडले असल्याची माहिती जिओ न्यूजनं दिली आहे.
शुक्रवारच्या नमाज पठनाच्या वेळी एका आत्मघातकी बॉम्बरनं स्वत:ला गर्दीमध्ये स्फोटकांनी उडवून दिलं. या हल्लानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणी मदतकार्य सुरु झालं आहे.
नमाज पठणाच्या वेळी गर्दीला लक्ष्य करत हा दुर्देवी हल्ला करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पेशावरमधील जामा मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पठण सुरु होते. त्याचवेळी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. पेशावर जिल्ह्यातल्या कोच्या रिसाल्दर परिसातील किस्सा ख्वानी बाजारात असलेल्या या मशिदीमध्ये हा मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या आत्मघातील हल्ल्यामध्ये दोन हल्लेखोर सहभागी होते. नमाज पठणाच्या वेळी हे दोघे मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर या हल्लेखोरांनी गोळीबार सुरु करत स्वत:च स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.
या भागात अजून बॉम्बहल्ले वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून जामा मशीद परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.