मॅथ्यू हेडन म्हणतोय या एका गोष्टी मुळे चेन्नई सुपर किंग्ज जिंकणार IPL!

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

यातच आता चार वेळा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन राहिलेली टीम  चेन्नई सुपर किंग्स (CSK) नेतृत्वा मध्ये बदल होऊनही आयपीएल २०२२ चे विजेतेपद टिकवून ठेवण्यास सक्षम आहेत, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी व्यक्त केला आहे. तथापि, सीएसकेला या मोसमातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला, ज्यामध्ये त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही त्यांना हवी तशी कामगिरी करू शकली नाही.

पण रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्सशी सामना करताना ब्रेबॉर्न स्टेडियमवर आपला सामना जिंकून पहिला गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियन फलंदाज हेडन म्हणाला, “केकेआर विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सीएसके निराश होणार नाही. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघासाठी अनेक सकारात्मक गोष्टी होत्या. पहिल्या सामन्यात त्यांच्या शीर्ष क्रमाला यश मिळाले नाही, परंतु त्यात खूप अनुभव आहे. मला खात्री आहे की ते पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करतील.” तो पुढे  म्हणाला, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मोईन अलीची उणीव भासली आणि तो पुढील सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल.

विशेष म्हणजे या मोसमातील पहिल्याच सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. CSK चा कोलकाता नाईट रायडर्सने ६ गडी राखून पराभव केला. आता संघ आपला दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकून सीएसकेला स्पर्धेत पुनरागमन करायचे आहे.

यातच मॅथ्यू हेडन ने CSK चे गुपित सांगत म्हणाला धोनी सारखा जगप्रसिद्ध कर्णधार आमच्या सोबत आहे. जरी कर्णधार जडज्या असला तरी धोनीचा सल्ला घेतल्या  शिवाय जडज्या कोणताही निर्णय घेणार नाही. त्यामुळे धोनी चा अनुभव हेच आमचे महत्वाचे गुपित आहे. आता या पुढील सामन्यामध्ये CSK कशी कामगिरी करतीये हे पाहणे महत्वाचे धरणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप