भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी मयंती लँगर बिन्नी प्रसिद्ध टेलिव्हिजन अँकर आहे. आता आयपीएल २०२२ मुळे अनेक वर्षांनी लँगरने पुन्हा एकदा अँकरिंगच्या जगात पाऊल ठेवले आहे. मुलाच्या जन्मा मुळे ती आयपीएल च्या गेल्या मोसमात दिसली नव्हती. या काळात मयंतीच्या आयुष्यात सर्वकाही वाटते तितके सोपे नव्हते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मयंती लँगरला आयपीएल मधून जवळपास ४ वेळा वगळण्यात आले होते.
प्रतिभा, नोकरी किंवा इतर कोणत्याही कामाचा अभाव हे मयंतीला अँकरिंग पासून दूर जाण्याचे कारण नव्हते. उलट, ब्रॉडकास्टरला नवीन चेहऱ्याची गरज असल्याने असे घडले होते. मग मयंती लँगरने व्हर्व मॅगझिनशी केलेल्या संभाषणात तिच्या नकारांबद्दल उघडपणे बोलली होती.
मयंतीने सांगितले की, मला सलग ४ वेळा आयपीएलसाठी नाकारण्यात आले होते. २०११ च्या हंगामापूर्वी त्यांनी मला फोनवर सांगितले की, आम्ही तुला संघात समाविष्ट केले आहे. आता पुढच्या वेळी आम्हाला प्रोमो शूट करायचा आहे, आम्ही तुला पुन्हा सांगू. पण काही वेळाने त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि म्हणाले, तू नुकताच वर्ल्ड कप केला आहेस. तू आता हे करू शकत नाही, कारण आता आम्ही नवीन चेहरा शोधत आहोत. मयंती पुढे म्हणाली की, एक वेळ आली जेव्हा मी हार मानली होती. हे सर्व असे घडयला नको पाहिजे होते. असे पण न्हवते की मी चांगली नव्हती. पण मी ती न्हवती ते जे शोधत होते.
View this post on Instagram
आयुष्यात नकार मिळणे हे खूप कठीण आहे. त्याचा अवलंब करणं त्याहूनही कठीण आहे. पण आता मी त्याच्या सोबत जगायला शिकले आहे. कारण कदाचित आयपीएल माझ्या नशिबात नव्हते आणि मी आनंदीही होते. पण आयुष्यात पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही.
जेव्हा संधी तुम्हाला शोधत तुमच्या दारात येते तेव्हा ते कोणालाच कळत नाही. मग २०१८ साली मयंतीच्या बाबतीत असेच घडले होते जेव्हा IPL चे हक्क स्टार स्पोर्ट्सने विकत घेतले होते. त्यानंतर मयंती लँगर आयपीएलमध्ये अँकर म्हणून दिसली होती. जेव्हा मयंती लँगर आयपीएल मध्ये अँकरिंग साठी जात होती, तेव्हा तिचा पती स्टुअर्ट बिन्नीने तिचा पहिला सामना आयोजित करण्या पूर्वी तिचे अभिनंदन केले आणि म्हणाला, शेवटी तू ते करून दाखवलेस.