वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या T-२० मालिकेतील दुसरा सामना वॉर्नर पार्क स्टेडियम वर खेळला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार पुनरागमन करत ५ विकेट राखून विजय मिळवला होता. यासह विंडीजने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने नाणे फेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १३८ धावांत संपूर्ण संघ बाद झाला होता. प्रत्युत्तरात ब्रँडन किंगच्या अर्धशतकी खेळी च्या जोरा वर विंडीज ने १९.२ षटकांत ५ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. त्याच बरोबर या सामन्यात अनेक विक्रमही झाले होते. या विक्रमावर आपण एक नजर टाकूया.
View this post on Instagram
T-२० डावाच्या पहिल्या चेंडू वर भारतीय फलंदाज बाद झाला होता- केएल राहुल विरुद्ध जिम हरारे, २०१६, पृथ्वी शॉ वि एसएल कोलंबो आरपीएस, २०२१, रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज बसेटेरे, २०२२.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज- विजय १०, पराभूत १.
वेस्ट इंडिज विरुद्ध च्या T-२० मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच गोल्डन डकचा बळी ठरला होता.
या वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज च्या गोलंदाजांनी भारतीय संघाला ऑल आउट करण्यात यश मिळवले आहे.
T-२० मध्ये WI संघाची सर्वोत्तम आकडेवारी- ६/१७ ओबेद मॅककॉय विरुद्ध इंडिज बासेटेरे २०२२*. ५/१५ कीमो पॉल विरुद्ध बॅन मीरपूर २०१८. ५/२६ डॅरेन सॅमी विरुद्ध जिम पोर्ट ऑफ स्पेन २०१०. ५/२७ जेसन होल्डर विरुद्ध इंग्लंड ब्रिजटाउन २०२२. ५/२८ ओशाने थॉमस वि एसएल पल्लेकेले २०२०.
T-२० मध्ये भारत विरुद्ध सर्वोत्तम आकडेवारी- ६/१७ ओबेद मॅककॉय बॅसेटेरे २०२२*. ४/९ वानिंदू हसरंगा कोलंबो आरपीएस २०२१. ४/११ मिचेल सँटनर नागपूर २०१६. ४/१६ डॅरेन सॅमी पोर्ट ऑफ स्पेन २०११.
T-२० मध्ये सहा विकेट घेणारे गोलंदाज- ६/७ दीपक चहर विरुद्ध बान नागपूर २०१९. ६/८ अजंता मेंडिस वि जिम हंबनटोटा २०१२. ६/१६ अजंथा मेंडिस विरुद्ध ऑस पल्लेकेले २०११. ६/१७ ओबेद मॅककॉय वि इंड बासेटर २०२२*. ६/२५ युझवेंद्र चहल विरुद्ध इंग्लंड बेंगळुरू २०१७. ६/३० अॅश्टन आगर विरुद्ध न्यूझीलंड २०२१.