दामिनी चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी मीनाक्षी शेषाद्री आता दिसते अशी! तिचा न्यू लूक झाला आहे व्हायरल!!

सुमारे ८० ते ९० च्या काळात आपल्या निरागस सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री! वयाच्या ५८ वर्षी मिनाक्षीने तिच्या नव्या लुकमधील सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर केला आहे.

दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट चित्रपट करणाऱ्या मिनाक्षीनं स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली. बॉलिवूडमधील नावाजलेले दिग्दर्शक व दिगग्ज अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून तीने ओळख मिळवण्यात यश मिळवले होते. पण त्याच वेळी नाव, प्रसिद्धी, पैसा असं सर्व काही आलबेल असताना मिनाक्षीने एकाएकी सिनेसृष्टीतुन रजा घेतली! केवळ बॉलिवूडच इंडस्ट्रीच नाही तर चक्क देश सोडून ती परदेशात स्थायिक झाली. आता ही मिनाक्षी आपल्या सर्वांना आठवण्याचं कारण म्हणजे, तिचा व्हायरल झालेला नवा लुक!५८ वर्षांच्या मिनाक्षीने तिच्या नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांची वाहवा मिळवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Meenakshi Seshadri (@meenakshiseshadriofficial)

मिनाक्षीने स्काय कलरची हुडी या फोटोमध्ये घातलेली दिसत आहे.तसेच तिच्या डोळ्यांवर चष्मा आहे आणि केस देखील शॉर्ट आहेत. तिच्या या नवीन लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींना तिचा हा लुक आवडला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे फोटो पाहून तोंडं वाकडी केली आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिनाक्षी सध्या तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. १९९५ साली मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं होत. आणि विशेष बाब म्हणजे, या लग्नाची बातमी तिने बराच काळ सगळ्यांपासून लपवून ठेवली होती.

लग्नानंतरही काहीकाळ ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटात काम करत राहिली. पण शेवटी मिनाक्षीच्या लग्नाची गोष्ट सर्वांसमोर आली आणि त्यानंतर मिनाक्षीने अचानक बॉलिवूड सोडून नवऱ्यासोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र ती कधीही कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

मागील काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणंही कठीण झालं आहे. मिनाक्षीच्या परिवारामध्ये तिला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मिनाक्षी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला जरी ‘अलविदा’ म्हणाली असली तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासताना दिसत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक नृत्याची अकॅडमी उघडली असून तेथील तरुणींना ती नृत्याचे धडे देते.

महान सुपरस्टार ऋषी कपूर यांनी २०१५ मध्ये मिनाक्षीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोत तिच्या चाहत्यांना देखील मिनाक्षीला ओळखणं अवघड झालं होतं. खुद्द ऋषी कपूर यांनी देखील सुरुवातीला मिनाक्षीला ओळखलं नव्हतं. मिनाक्षीला इतकं बदललेलं बघून त्यांनाही मोठा धक्का बसला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप