बुध ग्रहामुळे पलटणार या राशींचं नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?: ज्योतिष शास्त्र एक वैदिक कालीन विद्या आहे, ज्यामध्ये ग्रहांची चाल आणि प्रभावाने मनुष्याच्या भविष्यफळाचे अध्ययन केले जाते. वैदिक ज्योतिष मध्ये सुर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू – केतू ला ग्रहांची मान्यता दिली गेली आहे. हे सर्व ग्रह संक्रमण करते वेळी प्रत्येक राशी मध्ये काही वेळेसाठी थांबतात आणि याच्याच प्रभावाच्या विश्लेषणाने राशीफळ तयार होते.
ज्योतिष मध्ये जन्म कुंडली किंवा जन्म पत्रिका नेहमीच प्रत्येक व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कारण जन्म कुंडली मध्ये मनुष्याच्या जीवनाचा सार असतो. जन्म कुंडली कशी बनवावी किंवा जन्म कुंडलीची विधी जाणून घेणे कठीण काम नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार बुद्धी व्यापार आणि वाणीसाठी उत्तम ग्रह म्हणजे बुध ग्रह. हा बुध ग्रह ज्या व्यक्तीवर प्रसन्न असतो त्याला खूप मोठा फायदा होतो असंही म्हणतात. येत्या २६ मार्च रोजी बुध मीन या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध एकत्र येऊन जो योग तयार होतो त्याला बुधादित्य योग म्हणतात.
वृषभ : या राशीच्या लोकांना मानसिक शांतता मिळणार नाही. स्वतःचे मनस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु यांना नोकरीच्या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकतो. लाईफ स्टाईलमध्येही बदल घडणार आहेत.
कर्क : या राशीतील व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. तसच यांचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं.
मिथुन : या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. बुध ग्रह या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. तसेच करियरमध्ये चांगले बदल होऊ शकतात.
तुळ : या राशीच्या व्यक्तींवर जबाबादारी वाढणार आहे. जीवनात काही काळ मानसिक अशांतता राहिल. यांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच यांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे.
वृश्चिक : या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये अतिरिक्त काम करू शकतात. कुटुंबात काही कारणांनी वाद होऊ शकतात. तसेच नोकरीमध्ये बदलाचे चांगले योग येतील. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही काळ धीराने काम घ्यावं लागणार आहेत.