रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केलेल्या नव्या टेकनिकमुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन खूप प्रभावित झाला आहे. भारतीय संघाने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 2-1 अशी जिंकली. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या शानदार खेळीचे वॉनने कौतुक केले. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकांत 170 धावा करण्यात यशस्वी ठरला.
View this post on Instagram
मायकेल वॉन काय म्हणाला जाणून घ्या?: इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, “जडेजा 100/5 वरून 170 पर्यंत स्कोअर करण्यासाठी खूप कौतुका स्पद इंनिंग खेळली आहे. दुसरीकडे, भारताने ही टेकनिक, आक्रमकता यांच्या जोरावर आणि केएल राहुल परत आला तर तो संघालाअधिक बळकटी देताना दिऊन येइल. विश्वचषक अगदी जवळ आला आहे आणि भारतासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी घडत आहेत.
टीम इंडियाला T20 विश्वचषकापूर्वी पुन्हा गती मिळणे आवश्यक आहे झहीर खान: माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान, जो वॉनच्या शब्दावर सहमती दाखवली. इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या म्हणण्याशी तो सहमत होता. या मालिकेतील विजयामुळे भारतीय संघाला आवश्यक असलेला आत्मविश्वास मिळेल, असे माजी वेगवान गोलंदाज म्हणाला. तसेच जाहीर खान पुढे म्हणाला , “तुम्ही पुढे जाण्याबद्दल खूप बोलत राहता पण स्पर्धेपूर्वीच्या आठवड्यां मध्ये टीम इंडियाचा फॉर्म महत्त्वाचा असू शकतो.
त्याचबरोबर स्पर्धा जसजशी जवळ येईल तसतसा त्याचा आत्मविश्वास वाढवत राहायला हवे. इंग्लंडला पराभूत करणे सोपे नाही, हे निश्चित. त्यामुळे, जेव्हा तुम्ही चांगल्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता तेव्हा तुम्हाला वाटते की काही महिन्यांत तुम्ही स्पर्धा जिंकू शकाल.”
View this post on Instagram
माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 29.44 च्या सरासरीने 282 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने भारतासाठी 92 कसोटी सामन्यांमध्ये 32.95 च्या सरासरीने 311 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 7.64 च्या इकॉनॉमी रेटच्या मदतीने 17 विकेट घेतल्या आहेत.