दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हिड मिलर हा T-२० क्रिकेट तसेच इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात धोकादायक फलंदाजा पैकी एक आहे. आयपीएल च्या इतिहासात मिलरच्या बॅट मधून अनेक खेळी निघाल्या आहेत. पण डेव्हिड मिलर ने आयपीएल २०१३ मध्ये अशी खेळी खेळली होती, जी आज ही आयपीएलच्या इतिहासात नोंद आहे. डेव्हिड मिलरची अखेर आयपीएल २०२२ मध्ये बॅट चालली आहे. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला १९२ पर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. या ३१ धावा मिलरने अवघ्या १४ चेंडूत केल्या, ज्यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
या दरम्यान, डावाच्या १९ व्या षटकात मिलर चा किलर अवतार दिसला आणि युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन त्याचा बळी ठरला. सेनच्या या षटकात मिलरने ३ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार मारला. या षटकात गुजरात संघाने एकूण २१ धावा लुटल्या, त्या मुळे डावाच्या अखेरीस १९२ धावा पर्यंत गुजरातने मजल मारली.
View this post on Instagram
मात्र, एका क्षणी मिलर सुरुवातीच्या चेंडूं वर झुंजताना दिसला आणि गुजरात संघाने तेवतियाच्या आधी मिलरला पाठवून चूक केली असावी असे वाटू लागले पण मिलर रंगात आल्या वर विरोधी संघांची तारांबळ उडाली. मिलर ची ही खेळी उर्वरित संघां साठी ही धोक्याची घंटा आहे कारण मिलरची बॅट अशीच सुरू राहिली तर गुजरात संघाची फलंदाजी अजून चांगली होणार हे नक्की.
गुजरात चा संघ सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा शेवटचा सामना हरला होता आणि हा सामनाही हार्दिक चा संघ हरला, आगामी सामन्यां बाबत कोणती रणनीती आखाय ची याचा विचार कुठेतरी करावा लागेल. कर्णधार हार्दिक पंड्याचा फॉर्म गुजरात संघा साठी पुढील सामन्यां साठी चांगला ठरणार आहे.
2013 च्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना, मिलरने मोहाली मध्ये केवळ ३८ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या आणि आयपीएल मधील तिसरे जलद शतक झळकावले होते. त्या नंतर तो त्याच्या चाहत्या मध्ये किलर मिलर म्हणून ओळखला जाऊ लागला होता. मात्र, संघा च्या खराब कामगिरी मुळे त्याला नंतर कर्णधार पदा वरून वगळण्यात आले होते.