मोहम्मद शमी हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो सुमारे १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. मोहम्मद शमी हा रिव्हर्स स्विंगचा तज्ञ मानला जातो. जानेवारी २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पण केले आणि त्याच सामन्यात चार ओव्हर मेडन्स टाकल्या होत्या. मोहम्मद शमीने नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते व तेथे त्याने ५ बळी घेतले होते. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुरुवारी सांगितले की, तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी तयार आहे, परंतु सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा विचार त्याच्या मनात नाही.
मोहम्मद शमी ने india.com ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, मी सध्या कर्णधारपदाचा फारसा विचार करत नाही. माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवायला मी तयार आहे. खरे सांगायचे तर, कोणाला भारतीय संघाचे कर्णधार बनायला आवडणार नाही, पण मला कोणतीही जबाबदारी दिली जाईल, मी त्यात माझे पूर्ण योगदान देईन.
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांपासून शमी सातत्याने खेळत असल्याने भारताविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्यात आली आहे. शमी म्हणाला, मी सर्व फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे आणि जर तसे झाले तर मी त्याची वाट पाहत आहे.
भारत ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे, तर १६ फेब्रुवारीपासून कोलकाता येथे T-२० मालिका खेळणार आहे. भारतानंतर वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज केमार रोच, एनक्रुमाह बोनर आणि ब्रँडन किंग संघात परतले आहेत. मात्र, तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेटने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
मोहम्मद शमीने ६ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात अशोक दिंडाच्या जागी शमीचा समावेश करण्यात आला होता. भारताने हा सामना दहा धावांनी जिंकला होता, पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात शमीने ९ षटकात २३ धावा देत एक विकेट घेतली होती.
यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघातही स्थान मिळाले होते. २०१४ आशिया कपमध्ये, शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट घेणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला होता. शमीने या स्पर्धेत ९ विकेट घेतल्या होत्या.