लिलावात हर्षल पटेल, जेसन होल्डर यांच्यावर पडला पैश्यांचा पाऊस, नितीश राणालाही मिळाली मोठी रक्कम..!

आईपीएल २०२२ चा लिलाव सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या फेरीत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. अष्टपैलू जेसन होल्डरला लखनौने ८.७५ कोटींना विकत घेतले. त्याचवेळी स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर ८.५० कोटींना विकला गेला. त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे.

याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. आरसीबीने हर्षल पटेलला १०.७५ कोटींना खरेदी केले आहे. गेल्या मोसमात हर्षलने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. गेल्या मोसमात तो बंगळुरू संघाचा भाग होता. लिलावात देवदत्त पडिक्कलसाठी सर्व फ्रँचायझी मध्ये चांगलीच स्पर्धा होती. शेवटी, राजस्थान रॉयल्सने (RR) त्याला ७.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

सुरेश रैनाला कोणताही खरेदीदार मिळू शकला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी होती. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नई सोबत होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही आयपीएलमध्ये खरेदीदार मिळालेला नाही. बलाढ्य फलंदाज डेव्हिड मिलरला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. हे सर्व खेळाडू दिग्गज आहेत, मात्र त्यांचे नशीब चांगले नसल्याने पहिल्या दिवशी त्यांना खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही. त्याचबरोबर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनही दुसऱ्या फेरीत विकला गेला नाही. मात्र, त्यांना अजून एक संधी आहे.

या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला-

हर्षल पटेल – रु. १०.७५ कोटी, आरसीबी

दीपक हुडा – रु. ५.७५ कोटी, लखनौ

जेसन होल्डर – रु. ८.७५ कोटी लखनौ

नितीश राणा – रु. ८ कोटी, KKR

ड्वेन ब्राव्हो – रु. ४.४० कोटी, चेन्नई सुपर किंग्ज

देवदत्त पडिकल – रु. ७.७५ कोटी, राजस्थान रॉयल्स

रॉबिन उथप्पा – रु. २ कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्स

मनीष पांडे – रु. ४.६० कोटी लखनौ

हेटमायर – रु. ८.५० कोटी, राजस्थान रॉयल्स

जेसन रॉय – रु. २ कोटी रुपये, गुजरात टायटन्स

कागिसो रबाडा – रु. ९.२५ कोटी, पंजाब किंग्स

ट्रेंट बोल्ट – रु. ८ कोटी, राजस्थान रॉयल्स

श्रेयस अय्यर – रु. १२.२५ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स

शिखर धवन – रु. ८.२५ कोटी, पंजाब किंग्स

रविचंद्रन अश्विन – रु. ५ कोटी, राजस्थान रॉयल्स

पॅट कमिन्स – रु. ७.२५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स

फाफ डु प्लेसिस – रु. ७ कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

क्विंटन डी कॉक – रु. ६.७५ कोटी, लखनौ सुपर जायंट्स

डेव्हिड वॉर्नर – रु. ६.२५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप