आयपीएल मध्ये या ५ खेळाडूंवर होईल पैश्यांचा पाऊस, लागेल कोटींची बोली!

मित्रांनो आयपीएल २०२२ आता लवकर सुरु होत आहे आणि यासाठी सर्व टीम्स नी तयारी सुरु केली आहे यामध्ये अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळणार आहे. या म्हध्ये आपला पहिला खेळाडू आहे डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलायचे झाले तर तो असा खेळाडू आहे जो स्वबळावर सामने जिंकू शकतो. वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असला आणि त्याने कर्णधार म्हणून संघाला चॅम्पियनही बनवले असले, तरी गेल्या वर्षी हैदराबादने त्याला कर्णधारपदावरून हटवले. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. अशा परिस्थितीत या महान खेळाडूला आपल्या संघात सामावून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल.

आयपीएल २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स वर पैश्यांचा पाऊस पडला, गेल्या मोसमात केकेआरने त्याला १५.५ कोटींना विकत घेतले. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे तर, त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि तो अजूनही फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच, त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी२०२१-२२ ची ऍशेस मालिका जिंकली होती. T-२० बद्दल बोलायचे झाले तर तो बॉलिंग  आणि बॅटिंग दोन्हीत चांगली कामगिरी करतो. अशा परिस्थितीत कोणताही संघ कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना आपल्यासोबत समाविष्ट करू शकतो.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएल २०२१च्या पहिल्या सत्रातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात तो संघात परतला पण संघाने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि नंतर त्याला सोडून दिले. त्याची कामगिरी पाहता त्याने २०२० मध्ये दिल्लीला अंतिम फेरीत नेले होते. आयपीएल २०२२२ मध्ये त्याने त्याची मूळ किंमत २कोटी ठेवली आहे, हा खेळाडू स्वबळावर सामनाही जिंकू शकतो. या मुळे सर्व संघ त्यांच्यावर सट्टा लावू शकतात आणि त्यांच्यावर कोटींमध्ये बोली देखील लावली जाऊ शकते.

ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजांपैकी एक आहे. IPL बद्दल बोलायचे झाले तर तो मुंबई इंडियन्सशी बराच काळ जोडला होता पण IPL २०१७ मध्ये KKR ने त्याला ५ कोटींना विकत घेतले. त्याच्या गोलंदाजीचे सर्व चाहते आहेत आणि यावेळीही बोल्टवर करोडोंची बोली लावली जाऊ शकते असे दिसते.

कागिसो रबाडा

कागिसो रबाडा गेल्या दोन वर्षांत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आयपीएल २०२१ मध्ये त्यांना ४ कोटी मिळाले आणि यावेळी संघ त्यांना फक्त कोटींमध्ये खरेदी करेल असा अंदाज आहे. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. आता मेगा ऑक्शनला अवघे काही दिवस उरले असून, त्यानंतर सर्व संघ आपापल्या खेळाडूंसह सामन्यासाठी सज्ज होणार आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप