मॉन्टी पानेसरने त्याचे All Time ५ Top गोलंदाज निवडले, फक्त या भारतीय गोलंदाजाचा केला समावेश..!

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फिरकी पटू मॉन्टी पानेसर ने अलीकडेच आपल्या सर्वकालीन सर्वोत्तम ५ गोलंदाजांची निवड केली आहे. या गोलंदाजा च्या यादीत मॉन्टी ने ऑस्ट्रेलिया च्या गोलंदाजा वर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे. जिथे मॉन्टी ने दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आपल्या सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाजा च्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भारता कडून फक्त एका गोलंदाजाला स्थान मिळाले आहे. मॉन्टी पानेसर च्या पाचही गोलंदाजांची नावे जाणून घेऊया.

गेल्या दोन दशका मध्ये भारतीय संघात अनेक दिग्गज गोलंदाज दिसले. त्या गोलंदाजा मध्ये हरभजन सिंग च्या नावाचा ही समावेश आहे. ज्याचा मॉन्टी पानेसर ने आपल्या ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाजा च्या यादीत समावेश केला आहे. पण मॉन्टी च्या या फेव्हरेट लिस्ट मध्ये हरभजन शिवाय इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. या यादीत मॉन्टी ने हरभजन ला पाचव्या क्रमांका वर स्थान दिले आहे.

मॉन्टी पानेसर च्या या यादीतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने आपल्याच देशा च्या म्हणजे इंग्लंड च्या एका गोलंदाजाचा समावेश केला आहे. तर ऑस्ट्रेलिया च्या २ दिग्गज खेळाडूंना या यादीत स्थान दिले आहे. ज्या मध्ये ऑस्ट्रेलिया चा माजी गोलंदाज शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांका वर आणि अनुभवी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या क्रमांका वर आहे.

माँटी पानेसर च्या या यादीत त्याच्या देशाचा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पहिल्या क्रमांका वर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांका वर आणि महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या क्रमांका वर आहे. तर मॉन्टी ने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला चौथ्या क्रमांका वर स्थान दिले असून भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला पाचव्या क्रमांका वर स्थान दिले आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप