धोनी दर महिन्याला यामधून करतो करोडोंची कमाई, माहीकडे आहे आलिशान कार आणि बाईकचे कलेक्शन..!

महेंद्र सिंग धोनी ने छोट्याश्या गल्ल्यां मध्ये छोट्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण आज तो जगातील महान क्रिकेट पटूं मध्ये सामील झाला आहे. धोनी ने केवळ प्रसिद्धी च नाही तर सन्मान, भरपूर पैसा, करोडोंची संपत्ती आणि स्वत: च्या बळावर लक्झरी लाइफ कमावली आहे. चेन्नई सुपर किंग्स ने महेंद्रसिंग धोनीला आयपीएल २०२२ साठी १२ कोटीं मध्ये कायम ठेवले होते. CSK ने २००८ IPL मध्ये धोनीला पहिल्यांदा ६ कोटींना खरेदी केले होते. गेल्या वर्षी त्याची बोली १५ कोटींवर गेली होती.

महेंद्र सिंग धोनी हा जगातील प्रसिद्ध क्रिकेट पटू पैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे आणि तो चेन्नई सुपर किंग्ज कडून आयपीएल खेळत आहे. धोनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट पटू पैकी एक आहे. तुम्हाला माहिती आहे का एमएस धोनीला आलिशान कार आणि बाइक्स चा शौक आहे. या बाईक आणि कार सोबत धोनी अनेकदा दिसला आहे. त्याचे फोटो ही त्याने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर ही दर महिन्याला करोडों ची कमाई करतो. आयपीएल शिवाय तो अनेक ब्रँडच्या जाहिराती करून करोडोची कमाई करतो. धोनी कडे बाईक आणि कारचे मोठे कलेक्शन आहे. महेंद्र सिंग धोनी एका वर्षात किती कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का? मीडिया रिपोर्ट्स नुसार, महेंद्रसिंग धोनीची संपत्ती ८०० कोटी रुपया पेक्षा जास्त आहे. जाहिरात आणि क्रिकेट मधून तो दरवर्षी सुमारे ५० कोटी कमावतो.

धोनी कडे रेंज रोव्हर, ऑडी, बी एम डब्ल्यू, मर्सिडीज, टोयोटा, हमर आणि महिंद्रा या सारख्या अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे ज्यांची किंमत सुमारे लाखो रुपये आहे. काही गाड्यांची किंमत दोन कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. धोनीला बाइक्स चा ही खूप शौक असून त्याच्या कडे एका पेक्षा एक बाईक आहेत. धोनी कडे बुलेट, हायाबुसा, कावासाकी, निन्जा, यामाहा आर १, यामाहा थंडरकॅट आणि डुकाटी १०९८ सारख्या लक्झरी बाइक आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप