ऋषभ पंत मध्ये क्रिकेट खेळण्या साठी सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज बनण्याचे सर्व गुण आहेत, असे मत भारताचा माजी ऑफस्पिनर निखिल चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. पंतने रविवारी बेंगळुरू येथे कसोटीत अर्धशतक ठोकून कपिल देवचा ४० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. निखिल चोप्राने दावा केला की युवा ऋषभ पंत मध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि एमएस धोनीसारखे सामने एकहाती जिंकण्याची क्षमता आहे. ४८ वर्षीय खेळाडूचा असा विश्वास आहे की धोनीलाही पंतने आपले विक्रम मोडावेसे वाटेल.
ऋषभ पंत त्याच्या पायांचा चांगला वापर करत होता. त्याची सामना जिंकण्याची क्षमता अशी आहे की तो अॅडम गिलख्रिस्ट सारख्या सर्व महान यष्टिरक्षक-फलंदाजांना मागे टाकू शकतो. खुद्द एमएस धोनीला ही पंतने त्याचा विक्रम मोडावा असे वाटेल.ऋषभ पंत आपल्या चुकांची पुनरावृत्ती करत नाही आणि आक्रमक खेळ करूनही सावधपणे खेळत आहे हे पाहून निखिल चोप्राही प्रभावित झाला.
View this post on Instagram
तो म्हणाला, ऋषभ पंत पहिल्या डावातील चूक पुन्हा करत नाही हे पाहून बरे वाटले. तो असेच समंजस क्रिकेट खेळत राहिला तर त्याला रोखणे कठीण जाईल आणि हे भारतीय क्रिकेट साठी चांगले लक्षण आहे. बंगळुरू च्या फिरकी गोलंदाजांच्या उपयुक्त विकेटवर श्रेयस अय्यरने वेगळ्या शैलीत फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ९२ धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही ६७ धावा केल्या. चोप्राच्या मते, अय्यरच्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांना सेट होण्याची संधी दिली नाही.
माजी फिरकीपटू म्हणाला, श्रेयस अय्यर ने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरून एक स्पष्ट गेमप्लॅन दिसत होता. जेव्हा तुम्ही क्रीजच्या बाहेर जाऊन बचाव करता आणि क्रीजचा वापर करता तेव्हा तुम्ही गोलंदाजावर दबाव आणता. अशा प्रकारच्या दडपणा मुळे अशा विकेटवर धावा काढण्याची उत्तम संधी मिळते. त्यामुळे तो ज्या प्रकारे आत्मविश्वासा ने फलंदाजी करत आहे आणि त्याच्या गेमप्लॅन ची अंमलबजावणी करताना तो दाखवत असलेला आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद झाला आहे.
ऋषभ पंतने आतापर्यंत च्या कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये दिल्ली रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पण करताना ऋषभ फक्त १८ वर्षांचा होता आणि त्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर २३ डिसेंबर २०१५ रोजी, त्याने २०१५–१६ विजय हजारे ट्रॉफी मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. डिसेंबर २०१५ मध्ये, २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी त्याचे नाव देण्यात आले होते.