या दोन खेळाडूंना कमी लेखून मुंबईने लिलावात केले होते रिलिज, आता दुसऱ्या संघात करतायेत धडाकेबाज कामगिरी..!

आयपीएल २०२२ मधील ५ वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. या संघाने आता पर्यंत ८ सामने खेळले असून या संघाला सर्व सामन्या मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या वर्षी मुंबई इंडियन्सची अवस्था २०२० मधील चेन्नईची स्थिती तशीच दिसत आहे. आता पर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्या मध्ये रोहित शर्माचे सर्व प्लॅन फ्लॉप ठरले आहेत. लखनौ विरुद्ध हा संघ जिंकेल असे क्षणभर वाटले पण तसे झाले नाही.

या हंगामात संघाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच खराब राहिले आहे. या मोसमात संघाला या जुन्या खेळाडूंची उणीव भासत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन खेळाडूं बद्दल सांगणार आहोत जे गेल्या मोसमा पर्यंत मुंबईचा भाग होते, मात्र या हंगामात ते इतर संघांकडून खेळताना चांगली कामगिरी करत आहेत.

हार्दिक पांड्या: हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स कडून पदार्पण केले आणि २०२१ पर्यंत तो या फ्रँचायझीशी संबंधित होता. ७ वर्षात त्याने मुंबई साठी अनेक दमदार खेळी खेळल्या आणि संघाला विजया पर्यंत नेले होते. मात्र शेवटचा सीझन त्याच्या साठी खूप वाईट गेला होता. त्याने १२ सामने खेळले आणि ११३.३९ च्या स्ट्राइक रेटने १२७ धावा केल्या होत्या. त्याच्या खराब फिटनेस मुळे त्याने गोलंदाजी केली नाही. यामुळेच फ्रँचायझीने IPL २०२२ च्या मेगा लिलावापूर्वीच हार्दिकला सोडले होते.

मुंबईतून निघाल्यानंतर हार्दिकला नवीन आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा पाठिंबा मिळाला आणि या संघाने त्याला कर्णधार बनवले. या मोसमात हार्दिक पांड्या गुजरात साठी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. या मोसमात त्याने आता पर्यंत ६ सामने खेळले असून १३६.५७ च्या स्ट्राईक रेटने २९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना ३ अर्धशतकेही झळकावली असून ७.५७ च्या इकॉनॉमी रेटने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

कृणाल पंड्या: या यादीत दुसरे नाव आहे हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्या, ज्याने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्स कडून पदार्पण केले होते. मात्र त्याची सर्वोत्तम कामगिरी आयपीएल २०१७ मध्ये पाहायला मिळाली होती. त्या हंगामात खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांमध्ये १३५.७५ च्या स्ट्राइक रेटने २३७ धावा केल्या होत्या. गोलंदाजी करताना त्याने ६.८२ च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट्स देखील घेतल्या होत्या. गेल्या हंगामात त्याने अत्यंत खराब कामगिरी केली, त्यानंतर फ्रँचायझीने त्याला सोडले होते.

मुंबईतून निघाल्यानंतर, या हंगामात क्रुणालला लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीचा पाठिंबा मिळाला जिथे तो जोरदार कामगिरी करत आहे. कृणालने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात १४७.३७ च्या स्ट्राईक रेटने ११२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना त्याने ६.७८ च्या इकॉनॉमी रेटच्या मदतीने ७ फलंदाजांना बाद केले आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप