#Next_Year या ४ विदेशी खेळाडूंना मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये संघात सामील करण्याचा प्रयत्न करू शकते..! यावर तुमचं मत काय..?

आयपीएल २०२२ मध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आता पर्यंत आठ सामने खेळले असून सर्व सामन्या मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला विजयी मार्गावर परत येण्यासाठी आयपीएल २०२३ च्या लिलावात त्यांच्या संघात काही मजबूत खेळाडूंचा समावेश करण्यासाठी चांगले नियोजन करावे लागेल. आज आम्ही तुम्हाला त्या चार विदेशी खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना मुंबई इंडियन्स या खेळाडूंना संघात सामील करण्यासाठी आयपीएल २०२३ मध्ये प्रयत्न करू शकतात.

१) बेन स्टोक्स: कसोटी क्रिकेट वर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी बेन स्टोक्सने IPL २०२२ मधून माघार घेतली होती. जर त्याची इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाली तर स्टोक्स आयपीएल २०२३ मधून देखील माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे. जर त्याने या लीग साठी स्वत:ची नोंदणी केली तर मुंबई इंडियन्स त्याच्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. या मोसमात कायरन पोलार्ड चांगल्या फॉर्म मध्ये नाही. मुंबईला भविष्यासाठी वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूच्या बदलीची गरज आहे. अशा स्थितीत बेन स्टोक्स हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

२) सॅम करण: सॅम कुरन हा परदेशी खेळाडूं पैकी एक आहे ज्याला मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये त्यांचा संघ मजबूत करण्यासाठी त्याच्यावर लक्ष्य केंद्रित करू शकतात. इंग्लंडचा हा युवा खेळाडू दुखापती मुळे आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नाही. मात्र पुढील मोसमात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सने डॅनियल सॅमचा पॉवरप्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणि खालच्या फळीतील बिग हिटर म्हणून वापर केला आहे. सॅम या दोन्ही गोष्टीं मध्ये हुशार आहे. त्याने आयपीएल मध्ये बॅट आणि बॉल या दोन्ही मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे करण हा मुंबई इंडियन्ससाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

३) शकिब अल हसन: शाकिब अल हसन आयपीएल २०२२ मध्ये खेळला नाही. पुढच्या मोसमात तो उपलब्ध झाला तर मुंबईने बांगलादेशच्या दिग्गज क्रिकेटपटू वर लक्ष्य केंद्रित करायला हवे. फ्रँचायझीला स्पिन गोलंदाजीत एका चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. अशा परिस्थितीत शाकिब हा असाच एक खेळाडू आहे जो गोलंदाजीत फ्रँचायझीला मदत करू शकतो.

४) मिचेल स्टार्क: मिचेल स्टार्क हा देखील परदेशी खेळाडूंपैकी एक आहे ज्याला मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये त्यांचा संघ मजबूत करण्यासाठी त्याच्यावर लक्ष्य केंद्रित करू शकतात. २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मुळे स्टार्क पुन्हा आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. मात्र त्याने आयपीएलसाठी नोंदणी केल्यास मुंबईने या गोलंदाजाला संघात सामील केले पाहिजे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप