चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबई इंडियन्सला या ३ कारणामुळे पराभवाचा सामना करावा लागला, हे दोन खेळाडू आहेत सर्वाधिक जबाबदार..!

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या मोसमातील श्वास रोखून धरणारा सामना ज्याची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती ती अखेर गुरुवारी रंगली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला या सामन्यात कमालीची उत्सुकता होती.

मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सचा खराब खेळ कायम राहिला. मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा निराश केले आणि सीएसकेने शेवटच्या चेंडूवर ३ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा या मोसमातील सलग ७ सामन्यातील हा ७ वा पराभव आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे. या सामन्यातील मुंबईच्या पराभवाची ३ मुख्य कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने निराश केले आहे. हिटमॅन रोहित शर्मा या मोसमात सातत्याने अपयशी ठरत आहे, जिथे त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही लाजिरवाणी कामगिरी केली. या सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. या सामन्यात रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो डावाच्या दुसऱ्या चेंडूवर मुकेश चौधरीचा बळी ठरला. पुन्हा एकदा रोहित शर्माची बेजबाबदार कामगिरी हे मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.

यंदाच्या आयपीएल मेगा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू इशान किशन पहिल्या काही सामन्यांनंतर धावा काढण्यासाठी धडपडत आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध इशान किशनकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जबाबदारी त्याच्यावर आली होती. या सामन्यात इशान किशनही फ्लॉप ठरला आणि डावाच्या पहिल्याच षटकात ० धावांवर बोल्ड झाला. किशनच्या खराब फलंदाजी मुळे मुंबई इंडियन्सला चांगलाच फटका बसला. जे या पराभवाचे मोठे कारण ठरले.

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. प्रत्येक सामन्यात संघाला एक ना एक धक्का बसत आहे. CSK विरुद्धचा चांगला रेकॉर्ड मुंबईच्या विजयाची साक्ष देत होता, पण मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सने पहिले ३ विकेट केवळ २३ धावांत गमावल्या. ज्यामध्ये रोहित शर्मा, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या धक्क्यांचा परिणाम मुंबईच्या संपूर्ण डावात दिसून आला, जिथे एकही फलंदाज मोकळेपणाने खेळू शकला नाही. अशा स्थितीत मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. हे त्यांच्या पराभवाचे एक कारण होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप