IPL च्या पुढील सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सने या ३ खेळाडूंना संधी दिली, तरच मुंबई दुसऱ्या संघाना नडू शकते.

मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण आयपीएलच्या १५ व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. या मोसमात संघ दोन सामने खेळला असून, दोन्ही सामन्या मध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात मुंबईला अपयश आले होते.

या मोसमात मुंबईला अजूनही पहिल्या विजयाची अपेक्षा आहे. मुंबईला पुढील सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचा आहे आणि मुंबईला हा सामना कोणत्याही परिस्थितीत गमवायचा नाही. मात्र मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर या सामन्यापूर्वी संघात काही बदल करावे लागतील.

डैनियल सैम्सच्या जागी फॅबियन ऍलन: मुंबईने पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्सचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. जो दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला आहे. दोन सामन्यांमध्ये सॅम्सने एकूण ८ षटके टाकली होती. ज्यामध्ये त्याने ११.१३ च्या इकॉनॉमी रेटने ८९ धावा दिल्या आहेत. यादरम्यान सॅम्सला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. त्याचवेळी फलंदाजी करताना त्याची बॅट शांत राहिली आहे. सॅम्सला दोन सामन्यांत फक्त ७ धावा केल्या आहेत. ही कामगिरी पाहून मुंबई संघ व्यवस्थापनाने केकेआरविरुद्ध त्याच्या जागी फॅबियन अॅलनला संधी द्यायला हवी.

अनमोलप्रीत सिंगच्या जागी सूर्यकुमार यादव: हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. यादवची उणीव तो भरून काढेल या आशेने संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी अनमोलप्रीत सिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून समावेश केला होता. मात्र अनमोलप्रीतला असे कोणतेही काम करण्यात यश आले नाही. या दोन सामन्यांमध्ये अनमोलप्रीतने १०० च्या स्ट्राईक रेटने केवळ १३ धावा केल्या आहेत.

बेसिल थम्पीच्या जागी जयदेव उनादकट: जसप्रीत बुमराह चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. गेल्या मोसमातील त्याचा जोडीदार ट्रेंट बोल्ट या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अशा स्थितीत मुंबईची गोलंदाजी थोडी कमजोर दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहला पाठिंबा देण्यासाठी बेसिल थम्पीला खेळवण्यात आले होते, परंतु या दोन सामन्यांमध्ये थम्पी फारसा प्रभावी ठरला नाही. त्याच्यात अनुभवाची कमतरता होती. थम्पीच्या खात्यात ३ विकेट्स आहेत, पण यादरम्यान त्याने १२.२० च्या इकॉनॉमी रेटने ६१ धावा दिल्या आहेत. थम्पीच्या जागी रोहित शर्माने जयदेव उनाडकटला संधी द्यावी. उनाडकटने आयपीएलमध्ये ८६ सामने खेळले आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप