मुंबई vs दिल्ली IPL 2022 : मुंबईच्या विजयावर RCB ने खूपच जल्लोष केला, पहा विराट आणि मॅक्सवेल चा अंदाज..!

इंडियन प्रीमियर लीग IPL २०२२च्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी त्यांना मुंबई इंडियन्सकडून ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. मुंबईचा हा विजय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मोठी बातमी घेऊन आला आहे.मुंबईच्या विजयासह विराट कोहलीचा संघ बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला असता तर ते पात्र ठरले असते आणि आरसीबी बाहेर गेले असते. अशा परिस्थितीत कोहली आणि संघाने मुंबईला साथ देत दिल्लीला हरवण्यात यश मिळवले.

आरसीबी टीमने मोठ्या स्क्रीनवर एकत्र बसून हा सामना पाहिला. मुंबई संघ जिंकताच कोहली आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिससह सर्व खेळाडू आणि कर्मचारी खूप खुश दिसून आले . कोहलीसह सर्वांनी जोरदार डान्स केला.आरसीबीने कोहली आणि इतर खेळाडूंचा आनंद साजरा करताना आणि नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंचाइजीने काही फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्येही कोहली, डु प्लेसिस आणि मॅक्सवेल डान्स करताना दिसत आहेत. कर्मचारी वर्गही उत्साहात दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore)


आरसीबीने १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. याशिवाय क्रमांक १ वर गुजरात टायटन्स क्रमांक २ वर राजस्थान रॉयल्स आणि क्रमांक ३ वर लखनौ सुपर जायंट्स ३ पात्र ठरले आहेत. या सामन्यात मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा संघ केवळ १५९ धावांवरच रोखला गेला. रोव्हमन पॉवेलने ३४ चेंडूत ४३ तर ऋषभ पंतने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ३ आणि रमणदीप सिंगने २ बळी घेतले.

View this post on Instagram

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore)

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप