ना पत्नी ना बाळ, सलमान च्या २३०० कोटी संपत्तीचा हा होणार वारसदार, भाईजान ने स्वतः केला खुलासा

सलमान खान हा एक असा अभिनेता आहे ज्याची फॅन फॉलोइंग जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. अभिनेता म्हणून लाखो लोक सलमान खानवर प्रचंड प्रेम करतात आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक करताना अजिबात थकत नाहीत. सुरुवातीच्या काळात तरुण वयात सलमान खानने कॅम्पा कोला नावाच्या एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीत काम केले, या जाहिरातीच्या माध्यमातून त्याच्या करिअरची खरी सुरुवात झाली. आणि मग सलमान ने मागे वळून पहिलेच नाही! त्याने ‘बीवी हो तो ऐसी’ या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात काम केले. पण या चित्रपटात सलमान खान सहाय्यक भूमिकेत दिसला असला तरी संपूर्ण चित्रपटभर त्याची वेगळी छाप पाडण्यात तो चांगलाच यशस्वी ठरला!

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानचा दुसरा चित्रपट ‘मैने प्यार किया’ हा मात्र सुपरडुपर हिट ठरला. खर्‍या अर्थाने येथूनच सलमान खानच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. यानंतर सलमान खानने भारतीय टेलिव्हिजनवर असंख्य हिट बॉलिवूड सिनेमांसह अनेक प्रसिद्ध शो देखील दिले आहेत आणि जगभरात स्वतःची एक हटके ओळख निर्माण करण्यात ही यश मिळवले आहे.

आजच्या घडीला सलमान खानकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. सलमान खान लाखो करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, सलमान खानकडे सध्या सुमारे २३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. बॉलिवूड चित्रपटसृष्टी बरोबरच जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीतही सलमान खानची प्रथम वर्णी लागते!

आपल्या या भाईजानकडे स्वतःचे खासगी जेटही आहे. इतकेच न्हवे तर तो महागड्या आणि आलिशान गाड्यांचाही मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि आलिशान वेगवेगळ्या गाड्यांचाही चांगला संग्रह आहे. त्याचबरोबर एका चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खान ५० ते ६० कोटीं पर्यंतची जबरदस्त फी घेतो. सलमान खान गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असून त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट आतापर्यंत केले आहेत.

सलमान खानने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लहानांपासूनन मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. विशेषतः मुलींवर सलमान खानची जादू चांगलीच पसरते! सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडले गेले आहे, मात्र आजपर्यंत सलमान खानने लग्न केलेले नाही.

भाईजानचे वय ५६ वर्षे आहे, आणि या वयातही तो बॅचलर आहे. सलमान खान सध्या लग्न करण्याच्या विचारात दिसत नाही. अशा स्थितीत सलमान खानच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण होईल? असा प्रश्न लोकांच्या मनात साहजिकच निर्माण झाला असेल. हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, तर त्याचे उत्तर खुद्द सलमान खाननेच दिले आहे.

एकदा सलमान खान त्याच्या प्रॉपर्टीबद्दल बोलला होता. या विषयात तो म्हणाला होता की, “मी लग्न करेन की नाही माहीत नाही, मी गेल्यावर माझी अर्धी मालमत्ता ट्रस्टला दान केली जाईल आणि जर मी लग्न केले नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता ट्रस्टला दिली जाईल.”

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप