अहमदाबाद: आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असेल याची निर्णय आज होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वॉलिफायर २ ची लढत होणार आहे. या लढतीमधील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल आणि २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध जेतेपदासाठी लढेल. या लढतीचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्सवर जाणून घ्या…
• १० षटकात मुंबईच्या ३ बाद ११० धावा
• सहा षटकात मुंबईच्या ३ बाद ७२ धावा
• मुंबईला मोठा झटका, आक्रमक तिलक वर्मा १४ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला- मुंबई ३ बाद ७२
• तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी- मोहम्मद शमीच्या एका ओव्हरमध्ये केल्या २४ धावा
• मुंबईला मोठा झटका- कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर बाद- मुंबई २ बाद २१
• कॅमरून ग्रीन retd hurt झाला
• मुंबईने गमावली पहिली विकेट- नेहल वढेरा ४ धावांवर बाद
• मुंबईच्या डावाला सुरूवात- नेहल वढेरा आणि रोहित शर्मा मैदानात
गुजरातच्या २० षटकात ३ बाद २३३ धावा
• साई सुदर्शन Retired Out. ३१ चेंडूत केल्या ४३ धावा
• मुंबई इंडियन्सला झटका, दुखापतीमुळे ईशान किशन मैदानाबाहेर गेला
• वादळी शतकानंतर शुभमन गिल बाद झाला, ६० चेंडूत १० षटकार, ७ चौकारांसह १२९ धावा
शुभमन गिलचे ४९ चेंडूत शतक- हंगामातील तिसरे शतक
Extraordinary!😯
Shubman Gill is putting on a show once again with his supreme batting 💥#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/aE8nEZxI19
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
• १० षटकात गुजरातच्या १ बाद ९१ धावा
• शुभमन गिलचे ३२ चेंडूत अर्धशतक; षटकार, चौकारांचा पाऊस
• मुंबईला मिळाली पहिली विकेट
पियुष चावलाने साहाला बाद केले- गुजरात १ बाद ५४
• पॉवर प्ले संपला, मुंबई इंडियन्सने केली मोठी चूक, गुजरातच्या ६० धावा
सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर शुभमन गिलचा कॅच सोडला
• ३ षटकात गुजरातच्या २० धावा
• गुजरातच्या डावाला सुरुवात, शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा मैदानात