भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या घरात झाले नव्या पाहुण्याचे आगमन!!

नुकताच भारतामध्ये आयपीएलचा सिझन संपला आहे. यंदादेखील आयपीएल मध्ये नवनवीन टीमचा समावेश झाला होता, सगळ्या टीम मध्ये चुरशीचे सामने देखील रंगले आणि यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान गुजराथ टायटन्स या संघाला मिळाला!

आयपीएल मध्ये खेळणाऱ्या अनेक भारतीय क्रिकेटर्सने यावेळी चमकदार कामगिरी केली तर काही आपला प्रभाव निर्माण करण्यात अयशस्वी ठरले. आता आयपीएल संपले असले तरीही भारतीय संघातील क्रिकेटर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येताना दिसत आहे. यातीलच सध्या चर्चेत येणारे एक मोठे नाव म्हणजे श्रेयस अय्यर!

आपल्या लॅव्हीश लाइफस्टाइल साठी, भारतीय फलंदाज आणि कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर ओळखला जातो. आपल्या दैनंदिन आयुष्यात शांत असलेला श्रेयस अय्यर मैदानावर तितकाच गंभीर झालेला दिसतो. इतर क्रिकेटर्स प्रमाणे श्रेयश लाही नवनवीन महागड्या गाड्यांचा प्रचंड शौक आहे. आता त्याच्या कार कलेक्शन मध्ये एका नव्या गाडीची दमदार एंट्री झालेली आहे!

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यर ने नुकतीच एका आलिशान Mercedes-AMG G 63 4Matic SUV

खरेदी केली आहे!! या कारची किंमत 2.45 कोटी रुपये इतकी आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्याच्या या नवीन गाडीची चर्चा रंगलेली दिसत आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना मर्सिडिज-बेंझ लँडमार्क कार्स मुंबईने असे म्हटले आहे की,

“भारतीय क्रिकेटपटू श्रेयस नवीन मर्सडीज बेंज 63 घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! स्टार कुटुंबात आम्ही तुमचे स्वागत करतो. तुम्ही या गाडीच्या ड्रायव्हिंगचा तितकाच आनंद घ्याल जितका तुम्ही तुमच्या कव्हर ड्राईव्हचा घेता!”

श्रेयस अय्यर च्या नेतृत्वाखाली यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. आयपीएल पॉइंट टेबल मध्ये केकेआर सातव्या नंबर वर होती. केकेआर या संघाने 14 पैकी सहा सामने जिंकले असले तरी उरलेल्या 8 सामन्यांमध्ये या संघाला दारुण पराभव पत्करावा लागलेला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप