१४ सामन्यात एकही अर्धशतक नाही, कपिल देव ने रोहित शर्माच्या फलंदाजी वर प्रश्न केले उपस्तित..!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने मागील काही काळा पासून फलंदाजीत काही खास कामगिरी केली नाही. आयपीएल २०२२ मध्ये त्याने अतिशय खराब कामगिरी केली होती. त्याने आयपीएल मध्ये १४ सामन्यात केवळ २४८ धावा केल्या होत्या. आयपीएल नंतर रोहितला दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या घर च्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती, त्यानंतर आता तो इंग्लंड दौऱ्या वर आहे. अशात माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव याने रोहित च्या फॉर्म वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कपिल देव याने एका मुलाखती दरम्यान रोहित शर्मा बद्दल बोलताना वक्तव्य केले की, रोहित शर्मा खूप चांगला खेळाडू आहे, यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पण मागील १४ सामन्यांत एकही अर्धशतक झळकावले नाही त्यामुळे त्याच्या वर प्रश्न तर निर्माण होतील. तुम्ही गॅरी सोबर्स, डॉन ब्रॅडमन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर किंवा व्हिव्ह रिचर्ड्स असा तुम्ही चांगली कामगिरी नाही केली तर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. या दिग्गज अष्टपैलू खेळाडू च्या मते रोहित शर्मा बद्दल काय चुकीच होतय याचं उत्तर फक्त तोच देऊ शकतो.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधारा ने आपले म्हणणे मांडताना तो म्हणाला की, रोहित आणि विराट सारख्या खेळाडूंनी आपल्या खेळाचा आनंद लुटावा. त्यांना कसे वाटते हे त्याच्या कामगिरी साठी खूप महत्वाचे आहे. त्यांना पुढील येणाऱ्या सामन्या मध्ये धावा कराव्या लागतील. रोहित शर्माला विश्रांती का देण्यात आली हे समजणे खूप कठीण आहे, असे कपिल देवचे मत आहे. कपिल देव याने निवडकर्त्यां च्या धोरणा वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तो म्हणाला, आजकाल निवडकर्ते कोणत्या खेळाडूला विश्रांती देत आहेत आणि कोणाला वगळले जात आहे हे समजण्या सारखे नाही.

भारतीय क्रिकेटला उंची वर नेणाऱ्या कपिल देव याचे मत आहे की, खेळाडूंनी आपली मानसिकता सुधारण्याची गरज आहे, कारण या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत तर संघा साठी अडचणी येऊ शकतात. कसोटी सामन्यातही रोहित शर्माची बॅट धावा करण्यात अपयशी ठरली. रोहितने सलामीला फलंदाजी करताना केवळ २५ धावा केल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप