कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे मार्गदर्शक डेव्हिड हसी आयपीएल २०२२ मधील संघाच्या आता पर्यंतच्या कामगिरीने खूप प्रभावित आहे. केकेआर ने आता पर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यात दोन जिंकले आहेत. श्रेयस अय्यर च्या नेतृत्वा खालील केकेआर ने चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज चा पराभव केला आणि आरसीबी कडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
केकेआर च्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यात उमेश यादव आघाडी वर आहे. मेगा लिलावात शेवट च्या क्षणी उमेशला फ्रँचायझी ने विकत घेतले होते. त्याने पहिल्या तीन सामन्यात ८ विकेट घेत पर्पल कॅप वर कब्जा केला आहे. उमेश यादव देखील २०१४ ते २०१७ पर्यंत KKR च्या संघाचा एक भाग होता, तो २०१४ मध्ये ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा देखील भाग होता.
View this post on Instagram
उमेश च्या आता पर्यंत च्या कामगिरी वर डेव्हिड हसी खूप खूश आहे आणि त्याने त्याला या हंगामातील सर्वोत्तम खरेदी म्हटले आहे. पहिल्या दिवशी खरेदीदार न मिळाल्या ने केआर ने मेगा लिलावा च्या दुसऱ्या दिवशी उमेश आणि अजिंक्य रहाणे ला खरेदी केले होते. दोन्ही खेळाडूंना KKR ने त्यांच्या मूळ किमतीत म्हणजेच 2 कोटी रुपये देऊन संघात सामील केले होते.
केकेआर च्या अधिकृत वेबसाईट वर हसी म्हटला आहे की, उमेश कदाचित या आयपीएल मधील सर्वोत्तम खरेदी आहे. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत लवकर विकेट्स घेतल्या आहेत. उमेश आणि भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) एकत्र चांगले काम करत आहेत. दोघेही ५-६ वर्षां पासून एकमेका सोबत काम करत आहेत. उमेश बद्दल मी एक गोष्ट सांगू शकतो की तो प्रत्येक सामन्या साठी तयार राहण्या साठी कठोर परिश्रम करत आहे.
उमेश यादवने आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल २०२२ च्या एका सामन्यात त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध ४ विकेट घेतल्या होत्या. त्याने आतापर्यंत ३ सामन्यात सर्वाधिक ८ विकेट घेतल्या आहेत. गेल्या ३ मोसमा बद्दल बोलायचे झाले तर उमेशने ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला आयपीएल २०२१ मध्ये संधी मिळाली नाही. २०२० च्या २ सामन्यात तो विकेट घेऊ शकला नाही, तर २०१९ मध्ये तो ११ सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या.