केवळ रणवीर नाही तर त्याचे आई-वडील आणि बहीणही खूप स्टायलिश आहेत, पहा त्यांची जब्बरदस्त लाईफ स्टाईल..!

बॉलिवूड इंडस्ट्रीतील फेमस कलाकार रणवीर सिंह नेहमी चर्चेत असतो. रणवीरने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. इंडस्ट्रीचा टॉप हिरो झाल्यानंतर त्याने यशस्वी नायिका दीपिका पदुकोणशी लग्न केले. रणवीर हा खूप मोठा आणि स्टायलिश अभिनेता आहे. तितकेच स्टायलिश त्याचे कुटुंब सुद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला रणवीरच्या स्टायलिश फॅमिलीबद्दल आणि त्यांच्या जीवनशैली बद्दल सांगणार आहोत.

रणवीरच्या पश्चात त्याचे वडील, आई आणि मोठी बहीण आहे. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला रणवीरच्या आईबद्दल सांगतो. रणवीरच्या आईचे नाव अंजू भवानी आहे. अंजू भावनानी अनेकदा अनेक इव्हेंट्समध्ये दिसते. ती देखील तिच्या मुलासारखिच खूप स्टायलिश आहे. मात्र, अंजू लाइम लाईटपासून दूर राहणे पसंत करते, परंतु तिला सुद्धा रणवीर सारखे स्टायलिश राहणे खूप आवडते.

रणवीर सिंग त्याचे वडील जगजीत सिंग भवनानी यांच्या खूप जवळ आहे. त्या दोघांचे नाते खूप जवळच्या मित्र सारखे आहे. रणवीरचे वडील व्यावसायिक आहेत. रणवीर अनेकदा वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो. दीपिका आणि रणवीरचे लग्न झाले तेव्हा, भवानीनी म्हटले होते – ये दीवानी तो भवानी हो गई. असे वक्तव्य करून त्यांनी दीपिकाचे त्यांच्या कुटुंबामध्ये स्वागत केले होते.

रणवीरने एकदा सांगितले होते की त्याला एक नाही तर दोन आई आहेत. रणवीर त्याच्या दुसऱ्या आईला त्याची मोठी बहीण रितिका भवानी म्हणतो. रणवीर म्हणतो की त्याला त्याची बहीण रितिकाकडून इतके प्रेम मिळाले की तो स्वतःला खूप नशीबवान समजतो. रणवीर असे ही म्हणाला कि मला प्रत्येक वेळी माझ्या मोठ्या बहिणीने चांगला सल्ला दिला म्हणून मी आज एवढा मोठा प्रवास करू शकलो. रणवीरच्या बहिणीचे लग्न झाले असून तिने अभिनेत्री म्हणून काम केले आहे. रणवीर एक कौटुंबिक माणूस आहे आणि त्याचे कुटुंब ही त्याची ताकद आहे. दुसरीकडे, दीपिकाच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, आई-बाबांव्यतिरिक्त तिला एक बहीण अनिशा देखील आहे, जी एक उत्तम गोल्फर आहे.

तुम्हाला माहिती आहे का की, रणवीर सिंह अनिल कपूरच्या कुटुंबाशीही संबंधित आहे. वास्तविक, रणवीर सिंह अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर भवानीचा भाचा आहे. अशा प्रकारे तो सोनम कपूर आणि रिया कपूरचा चुलत भाऊही बनला. याशिवाय रणवीर सिंगची बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरसोबत चांगली मैत्री आहे. रणवीर आणि अर्जुन कपूर हे एका कुटुंबासारखे आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप