आई झाल्यानंतर आता अनुष्काने घेतला मोठा निर्णय!!

बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा! क्रिकेटर विराट कोहली सोबत तिने लग्नगाठ बांधल्यानंतर आता त्यांच्या संसारवेलीवर एक गोड कळी देखील उमलली आहे! अनुष्का बर्‍याच काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर झाली आहे, आता या अभिनेत्रीने तिच्या व्यावसायिक आयुष्याशी निगडित एक मोठी घोषणा जाहीर केली आहे. अनुष्का आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून काहीशी दूर झाली होती. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना प्रश्न पडला होता की आता अनुष्का सिनेक्षेत्रात पुन्हा कमबॅक कधी करणार? पण आता हल्लीच एक मोठी बातमी मीडिया समोर आली आहे. आणि म्हणूनच अनुष्काच्या चाहत्यांमध्ये याबाबत जोरदार चर्चा होताना दिसत आहे!

अनुष्काने काही वर्षांपूर्वी अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं होतं, तीच हे प्रोडक्शन हाऊस चांगलं चालत देखील होत! मात्र आता अनुष्काने तिचे प्रॉडक्शन हाऊस सोडल्याच्या बातम्या पसरत आहेत. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ती तिच्या या प्रोडक्शन हाऊसमधून बाहेर पडत आहे. एक पोस्ट करून तिने तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली की, तिचे प्रोडक्शन हाउस ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ आता तीने सोडलं आहे!

अनुष्का यातून बाहेर पडली असली तरी, ही कंपनी बंद होणार नाहीये. तर आता तिचा भाऊ हे काम सांभाळण्यासाठी पुढे सरसावला आहे. तिच्या मीडिया पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले आहे की, तिने आतापर्यंत जे काही काम केले आहे त्याचा तिला अभिमान आहे. पण आई झाल्यानंतर तिला अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागत आहे. त्यामुळे यात ती अभिनयाची निवड करत आहे.

अनुष्का आता फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करणार असून तिच्या भावाने सुरू केलेले प्रॉडक्शन हाऊस ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ आता फक्त तोच सांभाळणार आहे. पोस्टमध्ये तिने असेही लिहिले आहे की, यामध्ये ती तिच्या भावाला नेहमीच प्रोत्साहन देईल. यासाठी अनुष्काने कर्णेशला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छाही दिल्या आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप