आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. अश्या या लीग बद्दल आता नव्याने चर्च्या सुरु झाली आहे.
इंडियन प्रीमियर लीगचे २०२२ वर्ष संपून जेमतेम एक आठवडा उलटला असतानाच या स्पर्धेच्या चर्चेचा बाजार पुन्हा तापला आहे. IPL २०२२ नंतर, भारतीय संघाला ९ जूनपासून घरच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळायची आहे. त्यामुळे याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी एका वर्षात दोन आयपीएलबाबत मोठा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील संभाषणात सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगमध्ये बरेच बदल पाहिले गेले आहेत आणि असे अनेक बदल भविष्यातही पाहायला मिळतील. आकाश चोप्राने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे बदल अचानक दिसणार नाहीत, पण त्यांना वेळ लागू शकतो. पण आगामी काळात आयपीएलचे दोन सीझन खेळवले जाऊ शकतात, यावर आकाश चोप्राचा ठाम विश्वास आहे.
आयपीएल २०२२ जर आपण असे गृहीत धरले की आयपीएल वर्षातून दोनदा खेळली जाईल, तर त्याचे स्वरूप काय असेल? या प्रश्नाच्या उत्तरात आकाश चोप्राने स्पष्टपणे सांगितले की, सध्या आयपीएलमध्ये १० संघ खेळत आहेत आणि आगामी काळात आयपीएलमधील सामन्यांची संख्या आणखी वाढेल.
आकाश चोप्रा म्हणतो की, एक मोठी आयपीएल होणार आहे ज्यामध्ये 94 सामने खेळवले जातील. आणि अशी एक आयपीएल असेल जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळत असतील आणि तो एका महिन्यात संपेल. दोन आयपीएल आयोजित करण्याच्या चर्चेत रवी शास्त्रींच्या चर्चेने जोर धरला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. रवी शास्त्री यांनी याबद्दल आधीच सांगितले आहे की, ही स्पर्धा इतकी मोठी झाली आहे की तुम्ही दोन आयपीएल टाळू शकत नाही. भविष्यात तुम्हाला या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागेल.