आता पर्येंत ऋषभ पंत ने खेळले २७ सामने, तर जाणून घ्या धोनी आणि पंत मध्ये पहिल्या २७ सामन्यात कोणी बाजी मारली..!

नुकतेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले आणि या सामन्यात टीम इंडियाला 5 विकेटने विजय मिळवून दिला. यासह टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. ऋषभ पंतने आपल्या ODI करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 27 सामने खेळले आहेत आणि त्याची तुलना नेहमीच धोनीशी केली जाते. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की धोनी आणि पंत यांच्यामध्ये पहिल्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत आणि सर्वाधिक शतके कोणाची आहेत. चला जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

ऋषभ पंतच्या पहिल्या २७ वनडे सामन्यांची आकडेवारी: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 27 एकदिवसीय सामन्यांच्या 24 डावात 36.52 च्या सरासरीने 840 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत फक्त 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावता आली आहेत. ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध पहिले वनडे शतक झळकावले. ऋषभ पंतची सर्वोच्च धावसंख्या 125 आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या 27 एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी: भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने पहिल्या 27 वनडेत 25 डावात 888 धावा केल्या होत्या. पहिल्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2 शतके ठोकली असली आणि तीन अर्धशतके झळकावण्यात त्याला यश आले. धोनीने पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावले आणि पहिल्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा होती.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

ऋषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीच्या सुरुवातीच्या २७ सामन्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर ऋषभ पंतने धोनीला तगडी टक्कर दिली असल्याचे कळते. जरी तो त्याच्यापासून थोडे मागे आहे. पण आगामी काळात पंत धोनीला प्रत्येक बाबतीत मागे सोडू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्हाला तुम्हाला सांगून अभिमान वाटत आहे कारण ऋषभ पंत ने मागच्या सामन्यांमध्ये जी अतिशी पारी खेळली होती त्यामुळे आपला भारतीय संघ विजयी झाला त्या विजयामध्ये ऋषभ पंत चे खूप मोठे योगदान होते हे आपण विसरून चालणार नाही. तसेच आज काल प्रत्येक गोष्टी मध्ये ऋषभ पंत ची तुलना धोनी शी होत असते. पण आपल्याला याचा अभिमान हवा आहे कि धोनी सारखा आपल्या भारतीय टीम ला एक सुंदर क्रिकेटर भेटला आहे आणि त्याचे नाव आहे ऋषभ पंत..

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप