आता टीम इंडियाने विराटचा पर्याय शोधायला आहे, तो संघात त्याच्या जागी फिट पण झाला आहे असं बोललं जात आहे..!

विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅट मधील कर्णधारपद सोडल्या नंतर टीम इंडिया आता विराट कोहली चा पर्याय शोधत आहे. विराट कोहली ही बराच काळ चर्चेत होता आणि तोही खराब फॉर्म मध्ये होता पण त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध च्या शानदार अर्धशतका ने सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. पण श्रीलंके विरुद्ध त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली तेव्हा तो संघाचा भाग नव्हता आणि त्याने या संधीचा चांगला फायदा उठवला होता.

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर ने गुरुवारी श्रीलंके विरुद्ध च्या पहिल्या T-२० मध्ये दमदार खेळी खेळली होती त्यामुळे भारताला २० षटकात १९९ धावा पर्यंत मजल मारता आली होती. त्याच्या बद्दल बोलायचे झाले तर, तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने चौथे T-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते, ज्यामध्ये त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारून जलद गतीने नाबाद ५७ धावा केल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

संजय बांगर यांनी एका खास संभाषणात सांगितले होते की “बेंच स्ट्रेंथ मजबूत होत आहे आणि श्रेयस अय्यर ला ज्या क्रमांकावर फलंदाजी साठी पाठवले जात आहे तो विराट कोहली नंबर ३ आहे. जर विराट कोहली काही सामन्या मध्ये उपलब्ध नसेल, तर मला वाटते की अय्यर हा खूप चांगला ३ क्रमांकचा पर्याय असू शकतो आणि कदाचित संघ व्यवस्थापन श्रेयस अय्यरकडे लक्ष देत असेल.

इरफान पठाणने ही विराट कोहलीचा पर्याय म्हणून श्रेयस अय्यरला सर्वोत्तम म्हटले आहे. तो म्हणाला होता की हा मुलगा जेव्हा त्याच्या फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्यात मजा येते. असे मोठे फटके खेळणारे एका जागी उभे राहत नाहीत तर तो ज्या प्रकारे बॅलन्स बनवतो ही त्याची स्वतःची क्षमता आहे आणि त्याने आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूला सोडताच सर्वांच्या नजरा अय्यरकडे लागल्या होत्या आणि मेगा ऑक्शन मध्ये (IPL २०२२ मेगा ऑक्शन) अय्यरचे नाव येताच त्याच्यावर पैशांचा पाऊस पडू लागला होता. अखेरीस श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले आहे. श्रेयस अय्यरला १२.२५ कोटींची मोठी रक्कम मिळाली आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप