पहिल्याच दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा चा बॉक्स ऑफिसवर धूम धडाका, पिक्चर पाहून सिनेमागृहात प्रेक्षकांना अश्रू..!

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

सध्या पाहायला गेलो तर ६३० पेक्षा अधिक स्क्रीन्सवर दिवस-रात्र ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे शो सुरू झालेले आहेत. अगदी सगळीकडे शो हाऊसफुल्ल होत आहेत! पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे. येत्या रविवारी सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट आणखी पैसा मिळवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by The Kashmir Files (@thekashmirfiles)

याबद्दलची मोठी बातमी म्हणजे हरियाणा सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा करमुक्त केला आहे. थिएटरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी पाहिल्यानंतर प्रेक्षकदेखील खूप भावूक झाले आहेत. प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडीओ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

आपलं घर! एक अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द! आपलं गाव! मनामधला एक हळवा कप्पा. आपलं घर कसंही असलं तरी ते आपल्याला प्रिय असतं. परंतु, समजा काही लोकांनी तुमच्या घरात घुसून तुम्हाला तुमच्या घरातून इतकंच नव्हे तर गावातून हाकलून लावलं, तुमच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, तर कसं वाटेल तुम्हाला? नेमकं हेच घडलंय काश्मिरी पंडितांच्या बाबतीत! आणि विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे.

सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द काश्मीर फाईल्स’ आधी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकण्यात आले. आता जवळपास ७ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप