पाकिस्तानी पत्रकाराचा दावा, शाहीन आफ्रिदीवर IPL लिलावात २०० कोटींची बोली लावली जाऊ शकते, भारतीय चाहत्यांनी केला ट्रोल..!

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव आता संपला आहे आणि यासह सर्व संघांचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे. जगातील या सर्वात महागड्या लीग मध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटू चे स्वप्न असते. मात्र, पाकिस्तान हा एकमेव देश आहे ज्याच्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच नाराज आहे. मात्र, दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने शाहीन आफ्रिदी बद्दल असे विधान केले आहे, ज्यामुळे चाहते त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत.

वास्तविक, सध्या पाकिस्तान मधील एका पत्रकाराचे ट्विट खूप व्हायरल होत आहे. इहतिशाम- उल- हक असे या गृहस्थाचे नाव असून त्याने आपल्या ट्विटर अकाऊंट वर एका ट्विट मध्ये लिहिले की, जर शाहीन आफ्रिदी आयपीएल २०२२ च्या लिलावात असता तर त्याच्यावर २०० कोटींची बोली लागली असती. यावरून पत्रकार खूप ट्रोल होत आहे.

या लिलावात भारतीय विकेटकीपर फलंदाज इशान किशन सर्वात महागडा ठरला होता. मुंबई इंडियन्स ने त्याला १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात माजी अष्टपैलू युवराज सिंगनंतर इशान हा दुसरा सर्वात महागडा भारतीय ठरला आहे.

या पाकिस्तानी पत्रकाराला ट्विटरवर ट्रोल करत एका चाहत्याने लिहिले की, २०० कोटींमध्ये किती शून्य असतात, तुम्हाला काही कल्पना आहे का? त्याचवेळी आणखी एका चाहत्याने लिहिले की, स्वस्त नशे बंद करा. काहीही मूर्खपणा करा. या ट्विटवर एक नजर टाकूया.

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान साठी आता पर्यंत २१ कसोटी सामन्या मध्ये ८६ विकेट घेतल्या आहेत, तर २८ वनडे मध्ये ५३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच बरोबर शाहीन आफ्रिदीने ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये एकूण ४५ विकेट घेतल्या आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप