सध्या बॉलीवूड असो की टॉलीवूड एखादा चित्रपट जर सुपर डुपर हीट अथवा ब्लॉकबस्टर ठरला तर त्याचा भाग २ प्रदर्शित करण्यात येतो. केजीएफ, केजीएफ २, बाहुबली, बाहुबली २ या यशस्वी चित्रपटानंतर आता येत आहे ब्लॉकबस्टर पुष्पा सिनेमाचा भाग २! सध्या जिकडे बघावं तिकडे पुष्पा सिनेमा, त्यातील गाणी, त्यातले डायलॉग सगळ्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. पुष्पा सिनेमा दक्षिण चित्रपट सृष्टीत गाजल्यानंतर तो हिंदीत देखील डब होऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
कोरोनाचे संकट असतानादेखील हिंदी मार्केटमध्ये या चित्रपटाने तब्बल ऐंशी कोटी कमावले याची चर्चा चित्रपटसृष्टीत पसरली आहे. अल्लू अर्जुन च्या या वेगळ्या स्टाइल वर तमाम जनता फिदा झालेली दिसते याचा प्रत्यय हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालताना दिसतोय यातून मिळतो.
View this post on Instagram
पुष्पा या सिनेमाची हिंदीत आवृत्ती आणण्यासाठी गोल्डमाईन टेलीफिल्म्सचे दिग्दर्शक मनिष शहा यांनी पुढाकार घेतला आणि त्याचे राईट्स विकत घेतले. पुष्पाच्या हिंदी डब आवाजाला दमदार साथ लाभली आहे श्रेयस तळपदे या मराठमोळ्या अभिनेत्याची !
पहिला भाग एवढा ब्लॉकबस्टर हिट ठरल्याने या सिनेमाचा दुसरा भाग कधी येणार ? असा प्रश्न सर्वच चित्रपट रसिकांना पडलेला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कॉन्फरन्स मध्ये मनीष शाह यांनी याबाबतचा खुलासा केला आणि याचा पुढील भाग कधी येणार याबद्दलची माहिती सर्वांना दिली.
‘पुष्पा द -रुल’ पार्ट टू’ या नावाने हा सिनेमा येणार असल्याचे शहा यांनी सांगितले. मार्च किंवा एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येईल आणि सर्व शूटिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते त्याचा भाग दोन प्रदर्शित करतील.
View this post on Instagram
हा सिनेमा कधीपर्यंत रिलीज होणार ?आणि चित्रपट बनण्यासाठी किती वेळ लागेल? या प्रश्नाचे उत्तर देताना मनिष शहा म्हणाले, याचा भाग एक बनताना साधारण दोनशे दहा दिवसांचे शूटिंग झालेले पण हा दीर्घ काळातील पिक्चर असल्याने याचा भाग-२ करण्यासाठी कदाचित २५० दिवसांचा कालावधी देखील लागू शकतो. त्यावेळी कोरोनाचे संकट नसेल आणि दुसऱ्या कोणत्या अडचणी नसतील तर याची शूटिंग बहुदा लवकर पूर्ण होईल अस ते म्हणाले. २०२३ मध्ये हा चित्रपट पूर्ण होऊन चित्रपट रसिकांच्या भेटीस येईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.