ऋषभ पंतच्या ओपनिंग वरून लोकांनी ट्विटरवर दिल्या जबरदस्त प्रतिक्रिया..!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI) अहमदाबाद येथे खेळवला गेला होता. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने शेवटच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आणि इशान किशनच्या जागी केएल राहुलचा समावेश केला होता. कर्णधार रोहित शर्मासह राहुल भारतीय संघाची डावाची सुरुवात करण्यासाठी येईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ओपनिंगला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा ध’क्का बसला होता.

आत्तापर्यंत मधल्या फळीत खेळणारा पंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी आला होता. पंतच्या ओपनिंग बद्दल ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया आल्या आणि आम्ही तुमच्यासाठी काही प्रतिक्रिया घेऊन आलो आहोत.

टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पहिल्यांदा सलामी करत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका टीम इंडियासाठी शानदार ठरली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यांचे दोन्ही एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक खास प्रयोग केला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा ध’क्का बसला होता. त्याला फारसे यश मिळाले नसले तरी संघ व्यवस्थापनाच्या विचाराने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता कर्णधार रोहित शर्माने या हालचालीचे कारण स्पष्ट केले नाही. टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन कोरोना संसर्गामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकला नाही.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप