आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी (१९ मार्च) सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया च्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारतीय संघाने स्कोअर बोर्ड वर २७७ धावा लावल्या होत्या. भारतीय फलंदाजी दरम्यान तीन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली, मात्र यादरम्यान पूजा वस्त्राकरने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकून सर्वांचीच लाइमलाइट लुटली आहे, आता या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय फलंदाजी दरम्यान संघाला पहिले दोन विकेट लवकर गमवावे लागले. २८ धावा पर्यंतच दोन्ही संघाचे सलामीवीर पॅव्हेलियन मध्ये परतले होते, मात्र त्या नंतर यास्तिका भाटियाने कर्णधार मिताली राजसह डाव पुढे नेत शतकी भागीदारी केली होती. हरमनप्रीत कौरने ही आवश्यक सामन्यात अर्धशतक ठोकले, परंतु या दरम्यान पूजा वस्त्राकर ने ३४ धावांच्या खेळीत स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकला.
View this post on Instagram
पूजाच्या बॅट मधून हा षटकार डावाच्या ४९ व्या षटकात दिसला. वेगवान गोलंदाज मेगन शुटने ओव्हरचा पाचवा चेंडू गुड लेन्थ वॉर टाकला, ज्यावर पूजाने उभे राहून ८१ मीटरचा लांब षटकार मारला होता. पूजाचा हा षटकार या स्पर्धेतील आता पर्यंत चा सर्वात मोठा षटकार आहे. या मुळेच आता या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पूजाने तिच्या डावात २८ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या, मात्र त्यानंतर तिने डावाच्या शेवटच्या चेंडूवर तिची विकेट गमावली आणि संघासाठी धाव घेतली. सामन्या बद्दल बोलायचे झाले तर, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ४९.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने १०७ चेंडूत ९७ धावांची सुरेख खेळी केली. लॅनिंगशिवाय एलिसा हिलीने ६५ चेंडूत ७२ धावा, रॅचेल हेन्सने ४३ आणि एलिस पेरीने २८ धावा केल्या. बेथ मुनी ३० धावांवर नाबाद राहिली.
या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने या स्पर्धेत आतापर्यंत पाचपैकी पाच सामने जिंकले आहेत. संघाचे १० गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी, भारतीय संघाचा हा सलग दुसरा आणि या स्पर्धेतील एकूण तिसरा पराभव ठरला आहे.