पुष्पा या चित्रपटासाठी केवळ श्रेयशच न्हवे तर या मराठी कलाकाने सुद्धा दिला आहे आपला दमदार आवाज, वाचून अभिमान वाटेल!

साऊथच्या पुष्पा सिनेमाचा गाजावाजा देशविदेश भर हिट होऊन जोरात गाजत आहे!
हिंदीत डब झालेल्या ‘पुष्पा’ला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं त्याचा दमदार आवाज दिला आहे. अगदी श्रेयसच्या दमदार आवाजामुळेच आणि मराठीच्या अनोख्या तडक्यामुळे पुष्पा चित्रपट हिंदी मध्ये जोशात गाजलाय असंही म्हटलं गेलंय. पण ‘पुष्पा’ गाजण्यामागे केवळ एकट्या श्रेयसचा आवाज नव्हता तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही आवाज यात सामील आहे.

पुष्पा द राईज हा सिनेमा गेल्या १७ डिसेंबरला रिलीज झाला. पण अद्यापही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं जणू लोकांना वेड लावलं आहे. संपूर्ण सिनेमाभर त्याचं ते खांदा वाकवून चालणं, पाय घसरत घसरत केलेला ‘श्रीवल्ली’ गाण्यावरचा डान्स, दाढीवरून हात फिरवत केलेली डायलॉगबाजी सगळंच एकदम भन्नाट जमून आलयं!

हिंदीत डब झालेल्या या सिनेमातील अल्लू अर्जुनची डायलॉगबाजी तर एकदम त्याला शोभून दिसत आहे. हिंदीत डब झालेल्या ‘पुष्पा’ला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं आवाज दिला आहे. ही माहिती तर आता सर्वपरिचित झाली आहे. श्रेयसचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी इतका फिट झाला की, अनेकांनी श्रेयसचं भरभरून कौतुक केलं. अगदी याबाबद्दल अल्लू अर्जुनने देखील एका इंटरव्ह्यू मार्फत दाद दिली. परंतु ‘पुष्पा’ हिंदीत गाजला तर याबाबत मुख्य कारण म्हणजे याच्या डबला लाभलेली इतर कलाकारांची दमदार साथ! तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण यात आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्याचा आवाज ही सामील होता.

चित्रपटात मंगलम श्रीनू याची दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला एका मराठी अभिनेत्यानं आवाज दिलाये. श्रीनूची भूमिका साऊथ स्टार सुनीलने साकारली आहे. या भूमिकेला मराठमोळे अभिनेते उदय सबनीस यांनी त्यांचा प्रभावी आवाज दिला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या श्रीवल्लीच्या पात्रासाठी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट स्मिता रोजमेयरने आपला आवाज दिला आहे. तर मंगलम श्रीनूची पत्नी दाक्षायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनुसुय्या भारद्वाजच्या पात्राला सबिना मौसमने आपला आवाज दिला आहे.

उदय सबनीस हे अभिनयासोबतच दिग्गज डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. याआधी अनेक चित्रपटांना त्यांनी आवाज दिला आहे. काही प्रसिद्ध हजार हुन अधिक कार्टून कॅरेक्टर्ससाठी त्यांनी आपल्या आवाज दिला आहे. उदय सबनीस यांनी अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप