भारतीय संघ इंग्लड पुढे भुईसपाट झाल्या नंतर राहुल द्रविड ने दिली खूपच तिखट प्रतिक्रिया..!

एजबॅस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या धक्कादायक  पराभवा नंतर  टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानि  या पराभवासाठी कोणालाही जबाबदार धरण्यास नकार दिला असून इंग्लंडने खूप चांगला खेळ केला असल्याचे त्यांनी सांगितले.

एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड कडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य केवळ 3 गडी गमावून पूर्ण केले. जो रूट 142 आणि जॉनी बेअरस्टोने 114 धावा करून नाबाद राहिला.  या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. यासह भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आणि त्यांना २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.

या पराभवासाठी मी कोणालाही दोष देत नाही – राहुल द्रविडराहुल द्रविडच्या मते, दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केला पण यजमानांनी मोठ्या संधी जिंकण्यात यश मिळवले आणि त्यामुळेच या सामन्यात ते पुढे गेले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाले..

View this post on Instagram

A post shared by Rahul Dravid (@rahuldravidofficial)

या कसोटी सामन्यात अनेक वेगळे क्षण आले. होय, दुसऱ्या डावात आम्ही सात विकेट्स लवकर गमावल्या होत्या, पण जर एखाद्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीला तुम्हाला 360 पेक्षा जास्त धावांचा बचाव करावा लागेल असे कोणी म्हटले तर आम्ही ते सहज स्वीकारले असते. ही धावसंख्या तितकी मोठी नसली तरी. कदाचित आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो असतो आणि आमची फलंदाजीही तितकी चांगली नव्हती. या नुकसानीसाठी मी कोणालाही जबाबदार धरू इच्छित नाही. महत्त्वाच्या वेळी इंग्लंडने आमच्याकडून आघाडी घेतली.

टेस्ट सीरिजनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये भाग घ्यायचा आहे. आता उद्या पासून T२० सिरीज ची सुरवात होत आहे. तरी आमच्या सोनिक मराठी कडून भारतीय टीम ला खूप खूप शुभेच्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप