कोट्यवधीच घर खरेदी करत रजनीकांत यांची सख्खी शेजारीन बनली आहे साऊथची ‘ही’ सुंदर अभिनेत्री! नाव वाचून व्हाल हैराण…

सूत्रांच्या खास रिपोर्ट्सनुसार, साऊथच्या या अभिनेत्रीने नुकतेच तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या अभिनेत्रीने चक्क सुपरस्टार रजनीकांत यांच्या बंगल्याजवळच असलेले तिचे नवीन घर विकत घेतले आहे. या घराजवळच ‘रांझना’ फेम हिरो धनुषही राहायला आहे.

या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे नयनतारा! नयनतारा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध बोल्ड अशी अभिनेत्री आहे. ती नेहमीच चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री तिच्या नवीन घराबाबत निर्माण झालेल्या गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. सूत्रांच्या बातमीनुसार, नयनताराने नुकतेच तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये राहण्यासाठी नवीन घर विकत घेतले आहे. विशेष म्हणजे सुपरस्टार रजनीकांत आणि ‘रांझना’ फेम धनुष या दोघांचेही बंगले तिच्या घराजवळच असल्याने ते दोघे ही हिचे शेजारी झाले आहेत!

View this post on Instagram

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

लवकरच एखादा चांगला शुभ मुहूर्त पाहून नयनतारा लवकरच तिच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा साऊथ इंडस्ट्री मध्ये पसरली आहे. रिपोर्ट्स नुसार मिळालेल्या बातमीनुसार, नयनतारा तिचा बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत लवकरच लग्न करणार असल्याचे समजते. आणि यासाठी दोघांनीही जोरदार प्लॅनिंग सुरू केले आहे. हे कपल सोशल मीडियावर कायमच एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असताना दिसत असते. आणि म्हणूनच आता लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही दोघांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून सिद्ध होत आहे. मात्र, या बातमी बाबत दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अजूनतरी मिळालेली नाही.

जर नयनताराच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, रजनीकांत कोस्टार असलेला तिच्या ‘अन्नत्थे’ या नावाच्या चित्रपटाद्वारे तिला आजकाल खूप प्रसिद्धी मिळत आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. सध्या नयनतारा चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आणि नुकतेच तिने ‘कथू वाकुला रेंदू कादल’चे या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काथू वाकुला रेंदू कादल हा चित्रपट नयनताराचा प्रियकर विघ्नेश शिवन दिग्दर्शित करत असून यामध्ये ती कोस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार आहे.

विघ्नेश पूर्वी नयनतारा प्रभुदेवासोबत असलेल्या अफेयरमुळे चर्चेत होती. असं सांगितलं जातं की, प्रभुदेवाचं या दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारावर जीवापाड प्रेम होतं. लग्न झाल्यानंतरही ते तिच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये गपचूप राहात होते. नयनताराचं देखील प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिनं चक्क ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. पण प्रभुदेवाचं रामलताशी लग्न झालं होतं. नयनताराशी असलेले हे छुपे संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलतानं कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवाय नयनतारापासून दूर राहण्यासाठी नवरा प्रभुदेवावर भरपूर दबाव टाकण्यास देखील सुरुवात केली होती. त्यानंतर यांचे संबंध संपुष्टात आले. आता नयनतारा विघ्नेशसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा टॉलिवूड इंडस्ट्री मध्ये पसरली आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप