टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा चर्चेत आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध च्या वनडे मालिकेत उपकर्णधार पद मिळूनही तो एकही वनडे खेळू शकला नाही. गुडघ्याच्या दुखापती मुळे वेस्ट इंडिज विरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. शिखर धवनच्या नेतृत्वा खाली भारताने मालिका ३-० ने जिंकली होती. त्याच्या जागी खेळणाऱ्या अक्षर पटेलनेही दुसऱ्या वनडेत मॅचविनिंग इनिंग खेळली होती.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रवींद्र जडेजा यांच्यात काही ठीक चालले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा स्थितीत त्याने नुकतीच इन्स्टाग्राम वर पोस्ट केली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वर खळबळ उडाली आहे. रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया हँडल वर स्वत:चा भारतीय जर्सीतील फोटो पोस्ट केला आहे आणि त्याच्या कॅप्शन मध्ये ब्लू अॅडिक्शन असे लिहिले आहे. या मुळे तो चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी वेलकम टू मुंबई अशी कमेंटही केली आहे. अलीकडेच, जडेजाने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून संपूर्ण CSK चे फोटो आणि पोस्ट काढून टाकल्या होत्या. यावर सीएसके व्यवस्थापनाने देखील उत्तर दिले की, सीएसके आणि रवींद्र जडेजा यांच्यात सर्व काही ठीक आहे. सर्व काही काळाचा खेळ आहे. आता फक्त या दोघांनाच माहित आहे की ते किती खरे आहे.
हंगामाच्या सुरुवातीला एमएस धोनीने कर्णधार पदा वरून पायउतार झाल्या नंतर सीएसके व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला कर्णधार घोषित केले होते. पण त्याचे कर्णधारपद फारसे यशस्वी ठरले नाही. १० सामने खेळल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. माजी कर्णधार पुन्हा कर्णधार झाला होता. एमएस धोनी कर्णधार झाल्या नंतर जड्डू दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर पडला होता.
आता मागील हंगामात एमआय व सीएसके हे दोन्ही संघ चालले नाहीत. दोन्ही संघांनी गुणतालिकेत तळाशी आपला हंगाम संपवला होता. कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्याच्या बाहेर पडल्या नंतर एमआयकडे संघाचा समतोल राखणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची कमतरता आहे. जड्डू मुंबईत आल्यास रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला खूप आनंद होईल. जड्डूच्या भविष्या बद्दल माहिती नाही. पण सोशल मीडिया वर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज च्या चाहत्यां मध्ये खूप काही सुरू आहे.