माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याने रविवारी सांगितले की, रोहित शर्माला भारताचा कसोटी कर्णधार बनवायला हवे. रोहितची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या कसोटी उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, मुंबई इंडियन्सचा कर्णधार दुखापतीमुळे गेल्या वर्षी भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकला नव्हता.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर पुढील कर्णधाराचा शोध सुरू झाला आहे. शास्त्री याने इंडिया टुडेला सांगितले की, जर रोहित तंदुरुस्त असेल तर त्याला कसोटीतही कर्णधार बनवायला हवे. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, पण दुखापतीमुळे तो तेथे जाऊ शकला न्हवता. जर त्याला उपकर्णधार बनवले होते तर त्याला कर्णधारपद का दिले जाऊ शकत नाही?
रोहित सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसू शकतो. तो सध्या ३४ वर्षांचा आहे आणि भारत भविष्यात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी तरुणांना तयार करण्याचा विचार करत आहे. शास्त्री याने ऋषभ पंतला भविष्यातील लीडर म्हंटले आहे. तो म्हणाला की, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने भावी कर्णधाराबाबत चर्चा करताना २४ वर्षीय पंतला लक्षात ठेवावे.
तो पुढे म्हणाला, ऋषभ हा एक जबरदस्त युवा खेळाडू आहे. प्रशिक्षक म्हणून मला त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्याच्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे तो नेहमी तुमचे ऐकतो. शास्त्री म्हणाला की, तो नेहमी त्याला पाहिजे ते करतो, परंतु ते खरे नाही. तो खेळाचे चांगले मूल्यांकन करतो आणि नेहमी आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याने नेहमीच नेतृत्व केले पाहिजे. हे लक्षात घेतले पाहिजे.
२००७ मध्ये आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या नियमित षटकांच्या खेळात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला होता. यानंतर त्याने बेलफास्ट येथे आयर्लंड संघाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली न्हवती. पण शेवटी रोहितने चांगली कामगिरी करत २० सप्टेंबर २००७ ICC विश्व ट्वेंटी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० चेंडूत ५० धावा केल्या होत्या. हा सामना देखील जिंकला ज्यामुळे भारत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या ६१ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या होत्या. या सामन्यासाठी रोहितची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.