चेन्नई स्पर्धेतून बाहेर पडल्या नंतर संतापला रवींद्र जडेजा, पराभवासाठी या खेळाडूला ठरवले जबाबदार..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या ३८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज ने ४ वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा ११ धावांनी पराभव केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज ने नाणे फेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज ने २० षटकांत ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्स वर १७६ धावाच करता आल्या. चेन्नई साठी अंबाती रायुडू ने ३९ चेंडूत ७८ धावा केल्या, मात्र रबाडा ने त्याची विकेट घेत चेन्नईच्या विजयाच्या आशा धुळीत मिळवल्या.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

एक वेळ हा सामना चेन्नई जिंकेल असे वाटत होते पण अंबाती रायडू आणि धोनीच्या विकेट्स नंतर ही आशा संपली होती. सामन्या नंतर चेन्नई चा कर्णधार रवींद्र जडेजा म्हणाला, आम्ही चांगली सुरुवात केली, शेवटी आम्ही १०-१५ धावा दिल्या. रायडू शानदार फलंदाजी करत होता. मी आधी म्हटल्या प्रमाणे त्यांना १७५ धावांच्या खाली ठेवता आले असते तर बरे झाले असते. पहिल्या ६ षटकामध्ये आम्हाला चांगली सुरुवात मिळाली नाही, जिथे आमच्यात कमतरता आहे आणि आशा आहे की आम्ही जोरदार पुनरागमन करू.

चेन्नई कडून अंबाती रायडू शिवाय ऋतुराज गायकवाड ने ३०, महेंद्रसिंग धोनीने ८ चेंडूत १२ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा १६ चेंडूत २१ धावा करून नाबाद राहिला होता. पंजाब किंग्ज कडून कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांनी २-२ विकेट घेतल्या, तर संदीप शर्मा आणि अर्शदीप सिंग यांनी ही १-१ विकेट घेण्यात यश मिळवले. अर्शदीप सर्वात किफायतशीर ठरला होता. त्याने ४ षटकात फक्त २३ धावा दिल्या होत्या.

पंजाब कडून शिखर धवन ने सर्वाधिक नाबाद ८८ धावा केल्या होत्या. त्याच्या शिवाय भानुका राजपक्षेने ४२ धावा केल्या होत्या. लियाम लिव्हिंगस्टोन ७ चेंडूत १९ धावा काढून बाद झाला. चेन्नई कडून ड्वेन ब्राव्हो २ आणि महेश येकशाना १ विकेट घेण्यात यशस्वी ठरले. या विजया नंतर पंजाब किंग्जचे ८ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. पॉइंट टेबल मध्ये सहाव्या क्रमांका वर आहे. चेन्नई सुपर किंग्जचे ८ सामन्यांत ४ गुण आहेत. हा संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांका वर आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप