या कारणाने जडेजाही IPL २०२२ मधून बाहेर, माहीच्या संघाला बसला मोठा धक्का..!

आयपीएल २०२२ अंतिम टप्प्यात आहे, पण गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) सध्या तरी काहीही योग्य होताना दिसत नाही. आता सीएसके चा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ मधून बाहेर पडला आहे. या डावखुऱ्या अष्ट पैलू खेळाडू ने नुकताच कर्णधार पदाचा राजीनामा दिला आणि त्या नंतर एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसके चे कर्णधारपद भूषवत आहे.

या स्टार अष्ट पैलू खेळाडूला नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना शरीराला दुखापत झाली होती. मात्र, असे असून ही जडेजा ने क्षेत्ररक्षण सुरूच ठेवले आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध च्या सामन्या तून बाहेर आल्या वर त्याच्या दुखापती चे गांभीर्य समोर आले होते.

सीएसके चा कॅम्प गेल्या काही दिवसा पासून जडेजा च्या दुखापती वर लक्ष ठेवून होता, पण जेव्हा त्याच्या दुखापती चे मूल्यमापन करण्यात आले, तेव्हा कोणतीही सुधारणा झाली नाही. आता जडेजा बाहेर पडल्या नंतर संघा वर किती परिणाम होईल, हे येणारा काळच सांगेल, पण चालू मोसमातील त्याच्या कामगिरी बद्दल बोलायचे झाले तर त्याने १० सामन्यांत केवळ ११६ धावा केल्या असून पाच विकेट्स घेतल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by CricWelly (@cricwelly)

सोशल मीडिया वर रवींद्र जडेजाचे खूप कौतुक झाले आणि मैदानातही त्याच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली होती. रवींद्र जडेजाची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षका मध्ये केली जाते, त्यामुळे त्याने झेल साठी केलेला हा प्रयत्न नेत्रदीपक होता. सामन्या बद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या होत्या. बंगळुरू कडून महिपाल लोमर ने ४२ धावा केल्या होत्या.

एकूण आयपीएल बद्दल बोलाय चे झाले तर ३३ वर्षीय जडेजा ने २१० सामने खेळले असून २६.६२ च्या सरासरी ने एकूण २५०२ धावा केल्या आहेत. तो १२७.६५ च्या स्ट्राईक रेट ने खेळतो आणि त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. चेंडूने ही त्याने ७.६१ च्या इकॉनॉमी रेटने एकूण १३२ विकेट्स घेतल्या आहेत. गत विजेत्या सीएसकेचा सामना १२ मे रोजी (गुरुवार) मुंबईतील आयकॉनिक वानखेडे स्टेडियम वर मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप