रवींद्र जडेजा ची बायको रिवाबाने तगड्या मतांनी गुजरात निवडणुकीत विजय मिळवला जडेजाची हि स्टाईल खूपच आवडली लोकांना ..!

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या आमदार म्हणून त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या हायकमांडने रिवाबा यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना जामनगरमधून तिकीट दिले होते. या जागेवर त्यांनी काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांचा हजारो मतांनी पराभव केला.

तिरंगी लढतीत रिवाबा जडेजाने जामनगरची जागा जिंकली: रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाच्या निवडणूक जिंकण्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूचे महत्त्वाचे योगदान आहे. मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ती आघाडीवर होती. जामनगरच्या जागेवर रिवाबाने आधीच बाजी मारली होती. अधिकृतपणे ती जिंकण्याची वाट पाहत होती  आणि या प्रतिक्षेचे रुपांतरविजयात  झाले. निवडणूक प्रचारात रवींद्र जडेजाने पत्नीला भक्कम साथ दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर जागेवर तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत रिवाबा ने आप आणि काँग्रेसच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

अशीच आहे जडेजा आणि रिवाबाची प्रेमकहाणी : रवींद्र जडेजा आणि  त्याची पत्नी रिवाबा पहिल्यांदा एका पार्टीदरम्यान भेटले होते. रिवाबाची जडेजाची बहीण नयना हिची आधीपासूनच चांगली मैत्री होती. पार्टीत भेटल्यानंतर दोघेही चांगले मित्र बनले. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. फेब्रुवारी 2016 मध्ये दोघांनी रवींद्र जडेजाच्या स्वतःच्या रेस्टॉरंट ‘जद्दूस फूड फील्ड’मध्ये एंगेजमेंट केली होती. रवींद्र जडेजाने ट्विटरवर याची माहिती दिली होती. काही महिन्यांनंतर, 17 एप्रिल रोजी रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघांना निधाया नावाची मुलगी झाली. रिवाबा जवळपास 35000 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप