आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने एमएस धोनीच्या कर्णधारपदा वर केला मोठा खुलासा..!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने आयपीएल च्या आगामी हंगामासाठी फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. डू प्लेसिस हा यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता पण या मोसमा पासून तो RCB चे नेतृत्व करताना दिसणार आहे. दुसरीकडे, एमएस धोनीची कर्णधारपदी नियुक्ती झाल्या नंतर डु प्लेसिसने कर्णधार पदाशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.

आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत फाफ डू प्लेसिस ला चेन्नई सुपर किंग्ज मधील सुरुवाती चे दिवस आठवले. त्याने सांगितले की, जेव्हा तो चेन्नई च्या संघात आला तेव्हा एमएस धोनीचे कर्णधारपद पाहून त्याला धक्का बसला होता. डु प्लेसिस म्हणाला, जेव्हा मी चेन्नई कडून खेळायला सुरुवात केली, तेव्हा मला माहित होते की कप्तानी कशी होते. पण एमएस धोनी माझ्या विचारा पेक्षा पूर्ण पणे वेगळा होता. कारण माझी संस्कृती दक्षिण आफ्रिकेची होती आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा धोनी पूर्ण पणे वेगळ्या प्रकारची कप्तानी करत होता. यातून मला माहित झाले की कॅप्टन्सी च्या वेगवेगळ्या शैली आहेत पण तुमची स्वतःची शैली असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी विराट कोहली सारखे बनण्याचा प्रयत्न करू शकत नाही कारण मी कोहली नाही, ना मी एमएस धोनी बनण्याचा प्रयत्न करू शकतो.

फाफ डू प्लेसिसच्या आयपीएल रेकॉर्ड बद्दल बोलायचे झाले तर त्याने या स्पर्धेत एकूण १०० सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याच्या बॅटमधून २९३५ धावा निघाल्या आहेत. त्याने २२ अर्धशतके केली आहेत. डू प्लेसिसची सर्वोच्च धावसंख्या ९६ धावा आहे. शनिवारी आरसीबी अनबॉक्स फ्रँचायझी कार्यक्रमात फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली होती. यावेळी संघाच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले होते.

डु प्लेसिसला कर्णधार बनवल्या बद्दल विराट कोहलीने आनंद व्यक्त केला. फाफला जबाबदारी मिळाल्याने आनंद होत असल्याचे त्याने सांगितले. तो त्याच्या कर्णधारपदाबद्दल आणि त्याच्या सोबत खेळण्याबद्दल उत्सुक आहे. आयपीएलशिवाय डु प्लेसिसकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याने दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेचे तीनही फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही चांगली राहिली आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण २३ शतके आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप